सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा 'तो' फोटो इंटरनेटवर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 12:04 IST2019-03-11T11:57:41+5:302019-03-11T12:04:13+5:30
अनेक दिवसांपासून कार्तिक आर्यनचे नाव सारा अली खानसोबत जोडण्यात येते आहे. साराने कार्तिकबरोबर कॉफी डेटवर जाण्याची इच्छा बोलवून दाखवली होती

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा 'तो' फोटो इंटरनेटवर व्हायरल
अनेक दिवसांपासून कार्तिक आर्यनचे नाव सारा अली खानसोबत जोडण्यात येते आहे. साराने कार्तिकबरोबर कॉफी डेटवर जाण्याची इच्छा बोलवून दाखवली होती. त्यानंतर दोघांचे नाव कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहिले. सध्या सारा आणि कार्तिक इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आजकल'च्या सीक्वलच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. नुकतेच या जोडीचे सेटवरचे काही खास फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सेटवर उभे दिसतायेत. सेटवरील दोघांची केमिस्ट्री या फोटोमधून स्पष्ट दिसतेय. नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. यात कार्तिक आणि सारा एकमेकांना किस करताना दिसले होते.
सारा आणि कार्तिकसोबतच अभिनेता रणदीप हुड्डासुद्धा 'लव आजकल'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. २००९ मध्ये आलेल्या सैफ अली खान व दीपिका पादुकोणच्या ‘लव आजकल’ सुपरडुपर हिट झाला होता. इम्तियाज अली हा जब वी मेट, लव्ह आज कल, तमाशा यांसारख्या अनोख्या प्रेमकहाणींसाठी, चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. आता सारा व कार्तिकला घेऊन ती काय घेऊन येतात, ते बघूच. मात्र अद्याप हे स्पष्ट झाले नाही की, सारा आणि कार्तिक सिनेमाचे शूटिंग करत होतो की कोणत्या जाहिरातीचे. एक मात्र खरं दिवसांदिवस सारा आणि कार्तिकच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसतेय. त्याचा फायदा त्यांच्या सिनेमाला होईल यात काहीच शंका नाही.