रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये कॅटरिना कैफ नाही तर सारा अली खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 10:14 IST2019-01-02T10:14:15+5:302019-01-02T10:14:54+5:30

रेमो डिसूजा ‘एबीसीडी 3’ या डान्स फिल्मच्या तयारीत लागला आहे.  रेमोच्या या चित्रपटासाठी वरूण धवनचे नाव पक्के झाले आहे. वरुणच्या हिरोईनचा शोध मात्र अद्यापही सुरु आहे.

Is Sara Ali Khan also being considered with Shraddha Kapoor for Remo D’souza’s dance film with Varun Dhawan? | रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये कॅटरिना कैफ नाही तर सारा अली खान!!

रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये कॅटरिना कैफ नाही तर सारा अली खान!!

ठळक मुद्देसिम्बा’ या साराच्या दुस-या चित्रपटाने मात्र १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे. साहजिकचं साराची डिमांड आता वाढली आहे. त्यामुळे रेमोच्या या डान्स सिनेमात सारा दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

रेमो डिसूजा ‘एबीसीडी 3’ या डान्स फिल्मच्या तयारीत लागला आहे.  रेमोच्या या चित्रपटासाठी वरूण धवनचे नाव पक्के झाले आहे. वरुणच्या हिरोईनचा शोध मात्र अद्यापही सुरु आहे. आधी या चित्रपटात वरूणसोबत कॅटरिना कैफ आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार अशी बातमी होतीे. वरूण व कॅटची जोडी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा डान्सिंग सिनेमा घेऊन   येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली होती. पण अचानक कॅटरिनाने म्हणे, या चित्रपटास नकार दिला. कॅट सध्या सलमानच्या ‘भारत’मध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे २० टक्के शूटींग अद्याप बाकी आहे. अशात व्यस्त वेळापत्रकामुळे कॅटला रेमोचा हा चित्रपट सोडावा लागला. मग काय, दिग्दर्शक व कोरिओग्राफर रेमो डिसूजा याच्यावर पुन्हा हिरोईन शोधण्याची वेळ आली.

या पश्चात या चित्रपटासाठी रेमोने जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सॅनन, श्रद्धा कपूर  यांच्या नावावर विचार चालवला असल्याची बातमी आली. पण ताजी बातमी खरी मानाल तर हा चित्रपट सारा अली खानच्या झोळीत पडण्याची शक्यता आहे. साराचा पहिला डेब्यू सिनेमा ‘केदारनाथ’ बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण ‘सिम्बा’ या तिच्या दुस-या चित्रपटाने मात्र १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे. साहजिकचं साराची डिमांड आता वाढली आहे. त्यामुळे रेमोच्या या डान्स सिनेमात सारा दिसली तर आश्चर्य वाटायला नको.


नुकताच रेमोने आपल्या या आगामी चित्रपटाचा टीजर  रिलीज केला होता. अर्थात या चित्रपटाचे अधिकृत नाव अद्याप जाहिर करण्यात आलले नाही. पण हा चित्रपट ‘एबीसीडी3’ म्हणजेच रेमोच्या ‘एबीसीडी’ सीरिजचा तिसरा भाग असल्याचे मानले जात आहे.  रेमो डिसूजा दिग्दर्शित या आगामी चित्रपटात प्रभु देवा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
या सीरिजमधील साआधीचे दोन्ही सिनेमे रेमो डिसूजा यानेच दिग्दर्शित केले होते. २०१३ मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअ‍ॅलिटी शोमधील डान्सरला घेऊन रेमोने ‘एबीसीडी’ (एनीबडी कॅन डान्स) बनवला होता. २०१५ मध्ये रेमो ‘एबीसीडी2’ घेऊन आला होता. या चित्रपटात वरूण धवन आणि श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये होते. आता रेमो ‘एबीसीडी3’ घेऊन येतो आहे. बड्या स्टारकास्टसोबतच ३ डी चित्रपट असल्याने याचे बजेटही मोठे असणार आहे.रेमोच्या या डान्स मुव्हीत आणखी काय काय एक्ससाईटींग पाहायला मिळते, ते बघूच.

Web Title: Is Sara Ali Khan also being considered with Shraddha Kapoor for Remo D’souza’s dance film with Varun Dhawan?