बॉक्स ऑफिसवर 'सनॉन सिस्टर्स'ची टक्कर; क्रिती आणि नुपूरचे चित्रपट एकाच दिवशी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 11:55 IST2023-09-22T11:54:20+5:302023-09-22T11:55:48+5:30

क्रिती सनॉन आणि नुपूर सनॉन या दोन बहिणींची टक्कर बॉक्स ऑफिसवर होणार आहे. 

'Sanon Sisters' clash at the box office; Kriti Sanon and Nupur Sanon film releases on 20th October | बॉक्स ऑफिसवर 'सनॉन सिस्टर्स'ची टक्कर; क्रिती आणि नुपूरचे चित्रपट एकाच दिवशी होणार प्रदर्शित

Kriti Sanon and Nupur Sanon

 क्रिती सनॉन आणि तिची बहिण नुपूर सनॉन या दोघींमधील जिव्हाळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. आता या दोन बहिणींची टक्कर बॉक्स ऑफिसवर होणार आहे. क्रिती सनॉनचा 'गणपत' हा चित्रपट 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. तर त्याचवेळी धाकटी बहीण नुपूर सनॉनचा पहिला चित्रपट 'टायगर नागेश्वरा राव' हाही 20 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

गणपत चित्रपटातमध्ये टायगर श्रॉफसोबत क्रिती झळकणार आहे. विकास बहल यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. विकासने याआधी कंगना राणौतसोबत क्वीन आणि हृतिक रोशनसोबत सुपर 30 हा चित्रपट केला होता. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता त्याचा आगामी चित्रपट 'गणपत' रिलीजसाठी सज्ज आहे. हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे. 

नुपूर सनॉन मोठ्या पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.  'टायगर नागेश्वर राव' हा मोठा बजेट साऊथ चित्रपट आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार रवी तेजा नुपूरसोबत पाहायला मिळेल. हा चित्रपट 4 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापुर्वी नुपूर ही अक्षय कुमारसोबत 'फिलहाल' या म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उरतले होते. यानंतर  2021 मध्ये 'फिलहाल-2' हे गाणेही रिलीज करण्यात आले होते. 

Web Title: 'Sanon Sisters' clash at the box office; Kriti Sanon and Nupur Sanon film releases on 20th October