​संजूबाबा म्हणतो, माझ्याकडून ‘तसली’ अपेक्षा करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 16:43 IST2016-06-12T11:13:11+5:302016-06-12T16:43:11+5:30

शाहरूख खान, सलमान खान यांच्यासारखे सुपरस्टार त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसत असताना आपल्या संजूबाबाने अर्थात संजय दत्तने ...

Sanjubaba says, do not expect 'slapstick' from me | ​संजूबाबा म्हणतो, माझ्याकडून ‘तसली’ अपेक्षा करू नका

​संजूबाबा म्हणतो, माझ्याकडून ‘तसली’ अपेक्षा करू नका

हरूख खान, सलमान खान यांच्यासारखे सुपरस्टार त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसत असताना आपल्या संजूबाबाने अर्थात संजय दत्तने यासाठी स्पष्ट नकार दिलाय. होय, संजय बॉलिवूडमध्ये कमबॅक करतोय. या त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल संजयला काही प्रश्न विचारण्यात आले. तुझ्या आगामी चित्रपटात तुझी एक मुलगीही असणार आहे,हे खरे आहे का? असा प्रश्न संजूबाबाला विचारण्यात आला. यावर संजूबाबाचे उत्तर ऐकण्यासारखे होते. झाडाच्या अवतीभवती फिरून मी आलिया भट्ट सोबत रोमान्स करू, असे तुम्हाला वाटत असेल तर प्लीज माझ्याकडून अशी अपेक्षा करू नका.(गौरी शिंदेच्या चित्रपटात शाहरूखसोबत आलिया भट्ट दिसणार आहे. संजयचा इशारा याकडे तर नसेल ना?) माझ्या वयाला शोभतील असेच चित्रपट मी करणार. त्यामुळे एका मुलीच्या बापाची भूमिका साकारताना मला काहीही लाज वाटत नाही,असे सडेतोड उत्तर संजूबाबाने दिले.. सही है मुन्नाभाई, मान गयें!!  

Web Title: Sanjubaba says, do not expect 'slapstick' from me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.