‘टायगर’ला चारी मुंड्या चीत करत रणबीर कपूर मिळवणार ‘टॉप४’मध्ये जागा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 20:42 IST2018-07-24T20:41:57+5:302018-07-24T20:42:32+5:30
रणबीर कपूरचा ‘संजू’ रिलीज होऊन महिनाभराचा काळ लोटलाय. पण बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाची घोडदौड सुरूचं आहे. रिलीजच्या २५ दिवसांच्या आत या चित्रपटाने ३३३.५५ कोटी रूपयांची कमाई केली.

‘टायगर’ला चारी मुंड्या चीत करत रणबीर कपूर मिळवणार ‘टॉप४’मध्ये जागा!!
रणबीर कपूरचा ‘संजू’ रिलीज होऊन महिनाभराचा काळ लोटलाय. पण बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाची घोडदौड सुरूचं आहे. रिलीजच्या २५ दिवसांच्या आत या चित्रपटाने ३३३.५५ कोटी रूपयांची कमाई केली. तीन दिवसांपूर्वी ‘संजू’ ने सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत पाचव्या स्थानावर उडी घेतली. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ला धक्का देत, ‘संजू’ने ‘टॉप5’मध्ये जागा मिळवली. यानंतर ‘टॉप४’कडे ‘संजू’ची वाटचाल सुरु आहे. यासाठीही सलमान खानच्याच ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाशी त्याची स्पर्धा आहे. सलमानच्या ‘टायगर जिंदा है’चे लाईफटाईम बॉक्सआॅफिस कलेक्शन ३३९.१६ कोटी रूपये आहे. हा आकडा पार करण्यासाठी ‘संजू’ला आणखी केवळ सहा कोटी कमावण्याची गरज आहे आणि ते अशक्य नाहीये. कारण ‘सूरमा’ व ‘धडक’च्या रिलीजनंतरही ‘संजू’ प्रत्येकदिवशी सरासरी २ कोटी रूपयांची कमाई करतोय. म्हणजेच, येत्या आठवडाभरात रणबीर कपूर पुन्हा एकदा सलमान खानला धक्का देत, ‘टॉप४’मध्ये आपले स्थान बळकट करणार आहे. पुढील आठवड्यात रिलीज होऊ घातलेला ‘साहेबी बीवी और गँगस्टर3’ लोकांच्या पसंतीत उतरण्यास अपयशी ठरला तर, चौथ्या आठवड्यातही ‘संजू’च्या कमाईची घोडदौड कायम राहणार आहे.
‘संजू’चा ट्रेलर पाहून प्रत्येकजण रणबीरच्या प्रेमात पडला. पण एका व्यक्तिने मात्र हा ट्रेलर पाहून नाक मुरडले होते. ही व्यक्ती होती सलमान खान. होय, ‘संजू’च्या ट्रेलरबद्दल विचारल्यावर सलमानने वेगळेच उत्तर दिले होते. कुणीच संजय दत्तच्या भूमिकेला न्याय देऊ शकत नाही. त्याच्या बायोपिकमध्ये त्यानेचं काम करायला हवे होते, असे सलमान म्हणाला होता.