संजय ‘मार्को’ तून करणार पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 19:47 IST2016-11-01T19:47:10+5:302016-11-01T19:47:10+5:30
बॉलिवूडस्टार संजय दत्त पुढील वर्षी विधू विनोद चोपडाच्या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. विधू विनोद चोपडा सध्या अभिजात जोशी याच्यासोबत ...

संजय ‘मार्को’ तून करणार पुनरागमन
संजय दत्त कारागृहातून मुक्त झाला आहे. मात्र, अद्याप तो बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह झाला नाही. यामुळे तो कोणत्या चित्रपटातून पुनरागमन करेल याविषयी उत्सुकता लागली आहे. विधू विनोद चोपडा यांनी मामी फिल्म फेस्टीव्हलमध्ये आपल्या आगामी चित्रपटविषयी माहिती देताना संजय हा आपल्या चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले. विधू विनोद चोपडा म्हणाले, ‘आम्ही ‘मार्कोे’च्या स्क्रीप्टवर काम करीत आहोत. जोपर्यंत स्क्रीप्ट पूर्ण होत नाही, तोवर आम्ही चित्रपटाच्या निर्मितीला सुुरुवात करू शकत नाही. लवकरच स्क्रीप्ट पूर्ण करून चित्रीकरणाला सुुरुवात व्हावी असा आमचा प्रयत्न राहील. पटकथा मार्च - एप्रिलपर्यंत पूर्ण झाल्यानंतर आम्ही तेव्हाच शूटिंग सुरू करू’.
‘मार्कोे’या चित्रपटात संजय दत्त ‘गोहन’ नामक भूमिकेत दिसेल. यासोबतच विधू विनोद चोपडा यांची बहीण शैली ही दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात या चित्रपटातून करणार आहे. यावेळी कार्यक्रमाला संजय दत्त व लेखक अभिजात जोशी उपस्थित होते. विधू यावेळी म्हणाले, संजयला हे माहिती आहे आम्ही चित्रपटाची निर्मिती करताना कधीच घाई करीत नाही, मात्र ज्या दिवशी स्क्रीप्ट पूर्ण होईल त्याच आठवड्यात आम्ही शूटिंगला सुरुवात करू. हा चित्रपट २०१७ मध्ये रिलीज करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
दुसरीकडे संजय दत्तच्या जीवनावर राजू हिरानी चित्रपट तयार करीत असून, यात संजयची भूमिका रणबीर कपूर करीत आहे.