शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे संजय मिश्रा आजही राहतात भाड्याच्या घरात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 17:38 IST2018-06-08T12:08:25+5:302018-06-08T17:38:25+5:30

‘गोलमाल’मध्ये झळकलेले अभिनेते संजय मिश्रा यांनी चित्रपटांमध्ये कॅरेक्टर भूमिका साकारून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. जवळपास दोन दशकांपासून ...

Sanjay Mishra, who works in more than a hundred films, lives in the rented house! | शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे संजय मिश्रा आजही राहतात भाड्याच्या घरात !

शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे संजय मिश्रा आजही राहतात भाड्याच्या घरात !

ोलमाल’मध्ये झळकलेले अभिनेते संजय मिश्रा यांनी चित्रपटांमध्ये कॅरेक्टर भूमिका साकारून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. जवळपास दोन दशकांपासून इंडस्ट्रीत काम करीत असलेल्या संजय मिश्रा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपले एक दु:ख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, ‘गेल्या वीस वर्षांपासून मी चित्रपटांमध्ये काम करीत आहे. परंतु आजही मी भाड्याच्या घरात राहत आहे. त्यांनी सांगितले की, माझ्याकडे घर खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. 



पुढे बोलताना संजय मिश्रा म्हणाले, ‘गेल्या काही काळापासून सर्पोर्टिंग कलाकारांचे मानधन वाढविले आहे, परंतु अजूनही आम्ही जेवढी डिमांड करतो तेवढे मानधन आम्हाला मिळत नाही. यामागे माझा अ‍ॅटिट्यूड हेसुद्धा एक कारण आहे. मी निर्मात्यांना अगोदरच स्पष्ट करीत असतो की, अगोदर मला त्यांचे (लीड अ‍ॅक्टर्स) काम दाखवा. त्यानंतरच मी काम करणार. 



संजयच्या मते, जेव्हा चित्रपटात तुम्ही मुख्य भूमिका साकारत असता, तेव्हा निर्मात्यांकडून तुमच्यावर भरमसाठ पैसा गुंतविला जातो. प्रॉडक्शन टीमसुद्धा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करते. तर सर्पोर्टिंग भूमिका साकारणाºयांना सांगितले जाते की, तुमच्यामुळे चित्रपट बघितला जातो, परंतु त्यात सर्वाधिक श्रेय मुख्य अभिनेत्याचे आहे. हाच फरक मुख्य अभिनेता आणि सर्पोर्टिंग भूमिका साकारणाºयांमध्ये आहे. 



एनएसडीमध्ये पदवीचे शिक्षण घेणाºया संजयविषयी हे फारच कमी लोकांना माहिती आहे की, त्यांनी कधीकाळी अभिनयाला बाय-बाय केला होता. त्याचबरोबर एका छोट्याशा ढाब्यावर ते नोकरी करीत होते. पुढे वडिलांच्या मृत्यूनंतर संजय ऋषिकेशला निघून गेले. त्याठिकाणीच ते ढाब्यावर काम करीत होते. संजय यांनी आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले; मात्र अजूनही त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. 

Web Title: Sanjay Mishra, who works in more than a hundred films, lives in the rented house!