संजय दत्तच्या ‘भूमी’चे नवीन पोस्टर रिलीज; उद्या रिलीज होणार ट्रेलर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 18:16 IST2017-08-09T12:46:31+5:302017-08-09T18:16:41+5:30

निर्मात्यांनी पुन्हा एक पोस्टर रिलीज केले असून, त्यामध्येही संजूबाबाचा अंदाज बघण्यासारखा आहे. पोस्टरमध्ये अदिती राव हैदरी संजूबाबाच्या गळ्यात पडताना दिसत आहे. चित्रपटात अदिती संजूबाबाच्या मुलीच्या भूमिकेत दिसेल.

Sanjay Dutt's new poster release for 'Land'; Trailer to be released tomorrow! | संजय दत्तच्या ‘भूमी’चे नवीन पोस्टर रिलीज; उद्या रिलीज होणार ट्रेलर !

संजय दत्तच्या ‘भूमी’चे नवीन पोस्टर रिलीज; उद्या रिलीज होणार ट्रेलर !

िनेता संजय दत्त याच्या कमबॅक ‘भूमी’ हा चित्रपट सध्या खूपच चर्चिला जात आहे. या चित्रपटातून संजूबाबाला प्रचंड अपेक्षा असून, लोकांमध्येही त्याविषयीची उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. पोस्टर बघून सगळ्यांनाच कळून चुकले की, संजूबाबा या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक करणार आहे. आता निर्मात्यांनी पुन्हा एक पोस्टर रिलीज केले असून, त्यामध्येही संजूबाबाचा अंदाज बघण्यासारखा आहे. पोस्टरमध्ये अदिती राव हैदरी संजूबाबाच्या गळ्यात पडताना दिसत आहे. चित्रपटात अदिती संजूबाबाच्या मुलीच्या भूमिकेत दिसेल. 

दरम्यान, चित्रपटाचे पोस्टर संजूबाबाने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा नेहमीच तिला सांभाळणार आहे, ही भूमी आहे. हे चित्रपटाचे दुसरे पोस्टर आहे. उद्या ट्रेलर रिलीज केले जाणार आहे.’ ‘भूमी’ या चित्रपटात वडील आणि मुलीची कथा दाखविण्यात येणार आहे. चित्रपटात संजय दत्त आणि अदिती यांच्यासह शरद केळकर, शेखर सुमन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक ओमांग कुमार यांचे म्हणणे आहे की, ‘भूमी’च्या रूपात आम्ही संजय दत्त आणि त्याच्या चाहत्यांना अशा चित्रपटांची भेट देणार आहोत, ज्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. यावेळी ओमांग यांनी असेही म्हटले की, ‘भूमी’साठी आम्ही अफाट कष्ट घेतले आहेत. 
 

आता हे बघणे औत्सुक्याचे ठरेल की, ओमांग कुमारच्या या मेहनतीला प्रेक्षक कितपत प्रतिसाद देतील. दरम्यान, आतापर्यंत चित्रपटाचे तीन पोस्टर रिलीज करण्यात आले असून, तिन्ही चित्रपटांना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे संजयसह निर्मार्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 

Web Title: Sanjay Dutt's new poster release for 'Land'; Trailer to be released tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.