संजय दत्तच्या ‘भूमी’वर सेन्सॉरने चालविली कात्री, १३ सीन्स काढण्याचे दिले आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 21:35 IST2017-09-17T16:05:20+5:302017-09-17T21:35:20+5:30

संजय दत्त याच्या बहुप्रतीक्षित ‘भूमी’ या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालविली असून, तब्बल १३ सीन्स काढण्याचे आदेश दिले आहेत.

Sanjay Dutt's 'land' scissors, ordered to remove 13 pieces | संजय दत्तच्या ‘भूमी’वर सेन्सॉरने चालविली कात्री, १३ सीन्स काढण्याचे दिले आदेश!

संजय दत्तच्या ‘भूमी’वर सेन्सॉरने चालविली कात्री, १३ सीन्स काढण्याचे दिले आदेश!

जय दत्त आणि आदिती राव हैदरी यांच्या ‘भूमी’ चित्रपटाची रिलजची डेट जेवढी जवळ येत आहे तेवढीच चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच खºया अर्थाने ‘भूमी’मधील धमाकेदारपणा समोर आला असून, तोच प्रेक्षकांना भावत आहे. दरम्यान, ‘भूमी’विषयी एक बातमी समोर आली असून, चाहत्यांसाठी नक्कीच निराशाजनक म्हणावी लागेल. होय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेन्सॉर बोर्डाने ‘भूमी’मध्ये तेरा कट लावण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामध्ये सनी लिओनीचा हिट होत असलेल्या आयटम साँगचाही समावेश आहे. 

सनीचा हा आयटम नंबर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. ज्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय सनीच्या या गाण्याचा सुपरहिट श्रेणीमध्येही समावेश करण्यात आला आहे. जेव्हा ही बाब संजूबाबाला कळाली होती तेव्हा त्याने ट्विट करून सनीचे आभारही मानले होते. वास्तविक काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली होती की, संजय दत्तला सनीचा हा आयटम साँग चित्रपटात नको होता. कारण त्याला चित्रपटाच्या कथेनुसार हे गाणे अजिबातच संयुक्तिक वाटत नव्हते. असो, चित्रपटाच्या कट्सविषयी बोलायचे झाल्यास आदिती राव हैदरी हिच्यावर चित्रित करण्यात आलेला रेप सीन्स आणि काही शब्दांवर सेन्सॉरने आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर या सीन्सला कात्री लावण्याचे निर्मात्यांना आदेश दिले आहेत. 



‘भूमी’ हा चित्रपट संजूबाबाचा कमबॅक चित्रपट आहे. ज्याला ओमांग कुमार यांनी दिग्दर्शित केले आहे. संजूबाबाने या चित्रपटात अशा एका वडिलांची भूमिका साकारली आहे, जो आपल्या मुलीच्या आनंदासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. चित्रपटात आदितीने संजूबाबाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात सेन्सॉरने लावलेल्या कट्सविषयी संजूबाबाचे चाहते निराश झाल्याचे समजते. 

Web Title: Sanjay Dutt's 'land' scissors, ordered to remove 13 pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.