संजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 14:15 IST2018-04-24T08:36:12+5:302018-04-24T14:15:16+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून संजय दत्तचे फॅन्स त्याच्या बायोपिकच्या टीझर आणि पोस्टर लाँच कधी होतेय याची वाट मोठ्या आतुरतेने बघत ...

संजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात
ग ल्या अनेक दिवसांपासून संजय दत्तचे फॅन्स त्याच्या बायोपिकच्या टीझर आणि पोस्टर लाँच कधी होतेय याची वाट मोठ्या आतुरतेने बघत होते. आज अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बहुप्रतिक्षित 'संजू'चे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले. यानंतर काहीवेळातच निर्माता या चित्रपटाचा टीझरदेखील रिलीज करणार आहेत.
![]()
चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना उलगडण्यात येणार आहेत. पोस्टर रणबीर कपूर संजय दत्तच्या पाच वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळतो आहे. संजय दत्तच्या रुपातेली रणबीर कपूरचे हे पाच अवतार याची ग्वाही देतात. पोस्टर पाहताच तुमच्या लक्षात येईल की पहिल्या फोटोत संजय दत्तचे इंडस्ट्रतील सुरुवातीचे दिवस दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात 'मुन्ना भाई एमबीबीएस’चित्रपटाचा देखील विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. याला कारण ही तसेच आहे हा चित्रपट संजय दत्तच्या करिअरमधला टर्निंग पॉईंट ठरला होता. या चित्रपटाने रसिकांची पसंती तर मिळवलीच तर होतीच मात्र संजय दत्तची इमेज बदलण्यास मदत केली.
तिसऱ्या अवतारात रणबीर कपूर काळ्या कुर्ता आणि पौजाम्यामध्ये दिसतो आहे. हा लूक बघून राजकुमार हिराणीने संजय दत्तच्या चाळीशीचा टप्पादेखील चित्रपटात रेखाटला असल्याचे लक्षात येते. चौथ्या अवतारात रणबीर कैदीच्या ड्रेसमध्ये दिसतो आहे तर पाचव्यात ही तो त्याशाच काहीशा कपड्यांमध्ये दिसतो आहे ज्यावेळी संजय दत्त आपली शिक्षा पूर्ण करुन जेलमधून बाहेर आला होता.
ALSO READ : 'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार
हि भूमिका साकाराण्यासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. चित्रपटाला विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करीत आहेत.त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त हेदेखील गेस्ट अपियरेंस करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटाला विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करीत आहेत. चित्रपट २९ जून २०१८ मध्ये प्रदर्शित केला जाईल.