संजय दत्तवरील बायोपिकला नाव सुचविणाऱ्यास मिळणार बक्षीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 16:07 IST2017-03-11T10:20:43+5:302017-03-11T16:07:06+5:30

अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक सध्या सर्वत्र चर्चेत असली, तरी या बायोपिकचे अद्यापपर्यंत नाव निश्चित झालेले नाही. ...

Sanjay Dutt's biopic gets the name of the listener! | संजय दत्तवरील बायोपिकला नाव सुचविणाऱ्यास मिळणार बक्षीस!

संजय दत्तवरील बायोपिकला नाव सुचविणाऱ्यास मिळणार बक्षीस!

िनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक सध्या सर्वत्र चर्चेत असली, तरी या बायोपिकचे अद्यापपर्यंत नाव निश्चित झालेले नाही. त्याचबरोबर या बायोपिकला काय नाव द्यायचे असा पेच निर्मात्यांसमोर निर्माण झाल्याने त्यांनी हा पेच सोडविण्यासाठी चक्क लोकांच्या दरबारातच चेंडू ढकलला आहे. विशेष म्हणजे जो व्यक्ती या सिनेमासाठी योग्य नाव सुचवेल त्याला बक्षीस दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 



ही घोषणा गेल्या शुक्रवारी दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. यावेळी हिराणी यांच्यासोबत विधू विनोद चोपडा, अभिजित जोशी, अभिनेता अन् सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा रणबीर कपूर विकी कौशल उपस्थित होते. यावेळी हिराणी यांनी सांगितले की, संजय दत्तवरील बायोपिकचे अद्यापपर्यंत नाव निश्चित झालेले नाही. यासाठी आम्ही एक कॉन्टेस्ट घेणार असून, योग्य नाव सुचविणाºया बक्षीस दिले जाईल. यावेळी हिराणी यांनी चक्क उपस्थित पत्रकारांनाही या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. 

मात्र पत्रकारांनी हिराणी यांना लगेचच एक नाव सुचवित त्यांची पंचाईत केली. एका पत्रकाराने ‘व्यापम’ असे नाव ठेवण्यास हरकत नसल्याचे म्हटले. मध्य प्रदेशातील परीक्षा मंडळ घोटाळा ‘व्यापम’ या नावाने प्रसिद्ध आहे. या घोटाळ्याअंतर्गत अनेकांची हत्त्या करण्यात आली, तर काहींची कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र हिराणी आणि टीम या नावाविषयी फारसे सकारात्मक नसल्याचे बघावयास मिळाले. यावेळी पत्रकारांनी हिराणी आणि टीमला विचारले की, ‘भविष्यात तुम्ही एखाद्या राजकारण्यावर अशाप्रकारचा सिनेमा बनविण्याचा विचार करणार काय? यावर उत्तर देताना सर्वांनीच म्हटले की, जर कोण्या राजकारण्याने मी प्रामाणिक आणि सत्यवादी असल्याचे सांगितल्यास त्यावर नक्कीच विचार करू. आतापर्यंत असा एकही राजकारणी मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. 



यावेळी हिराणी सिनेमाविषयी माहिती देताना सांगितले की, मी ‘मुन्नाभाई - २’ बनविण्यासाठी संजूबाबाकडे गेलो होतो. मात्र जेव्हा त्याने त्याच्या आयुष्याची कथा सांगितली तेव्हा त्याच्यावर बायोपिक बनविण्याचा मी विचार केला. त्यानंतर जेव्हा मी संजूबाबाच्या परिवारातील लोकांशी चर्चा केली तेव्हा माझा बायोपिकचा निर्धार अधिकच पक्का झाला. संजूबाबाची कथा ऐकताना मला तब्बल दोनशे तासांची रेकॉर्डिंग करावी लागली. पुढे मी त्याच्या मित्रमंडळी, पत्रकार आणि चाहत्यांना भेटलो, कारण मी कधीच एकतर्फी सिनेमा बनवित नाही. जेव्हा मी संजूबाबाला भेटलो तेव्हा तो माझ्याकडे खूप रडत होता. वास्तविक जीवनात तो कधीच रडला नाही. मात्र यावेळी त्याने माझ्याकडे मनमोकळे केले. तो म्हणाला की, ‘माझे संपूर्ण आयुष्य तू अडीच तासांत दाखविले.’ 

यावेळी विधू विनोद चोपडा यांनी म्हटले की, हा सिनेमा मनोरंजक तर आहेच, शिवाय कौटुंबिकही आहे. या सिनेमाचा रफ-कटदेखील लोकांना पसंत येईल. कारण हा रफ-कट थ्री इडियटपेक्षा चांगला असेल. शिवाय या सिनेमातून बरेचसे शिकण्यासारखे असेल. कारण या सिनेमातून बाप-मुलाचे नाते काय असते अन् ते कुठवर टिकवायला हवे, याविषयीचा संदेश प्रेक्षकांना दिला जाणार आहे, तर सिनेमात मुख्य भूमिका साकारणाºया रणबीर कपूरने म्हटले की जेव्हा मी संजूबाबाची भूमिका साकारत होतो, तेव्हा मला असे वाटत होते की, त्या व्यक्तीत सर्वकाही आहे. कधी-कधी असे वाटत होते की, एक व्यक्ती आयुष्यात एवढ्या भूमिका कशा साकारू शकतो. कारण अशाप्रकारचे आयुष्य जगण्यासाठी किमान शंभर जन्म घ्यावे लागतील. 



पुढे बोलताना रणवीरने म्हटले की, मला संजय दत्त बनण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. कारण मला माहीत होते की, मला पुन्हा अशी भूमिका साकारण्याची संधी मिळणार नाही. कारण एखाद्या व्यक्तीला समजून त्याला पडद्यावर साकारणे खरोखरच अवघड आहे, असेही तो म्हणाला. आता हा सिनेमा पडद्यावर काय करिष्मा करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Sanjay Dutt's biopic gets the name of the listener!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.