‘भूमी’मधून संजय दत्त करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 18:48 IST2016-11-20T18:48:15+5:302016-11-20T18:48:15+5:30
संजय दत्त हा ओमंग कुमार दिग्दर्शित भूमी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी विधू विनोद ...

‘भूमी’मधून संजय दत्त करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक
मी ‘भूमी’ या चित्रपटाची स्क्रिप्ट स्वत: वाचली असून, त्यात मी जी भूमिका साकारणार आहे ती अतिशय सशक्त आहे. वडील व मुलगी यांच्या नात्यावर आधारित असलेला भूमी हा चित्रपट भावनाप्रधान व संवेदनशील विषयावर आधारित आहे, असे संजय दत्त याने सांगितले. भूषण कुमार यांच्या टी-सिरीज आणि संदीप सिंग व ओंमग कुमार यांचा लिजेंड स्टुडिओ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ओमंग कुमार यांनी ‘मेरी कोम’ व ‘सबरजीत’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्या जागेवर खिळवून ठेवणारा असून, यात भावना, बदला व पिता व मुलगी यांच्यातील नातेसंबंध केंद्रस्थानी असतील असे सांगण्यात आले आहे. निर्माता भूषण कुमार म्हणाला, संजय हा प्रतिभावंत कलाकार असून, त्याची निवड करण्यासाठी मीच पुढाकार घेतला. सहनिर्माता संदीप सिंग म्हणाला, ‘बाबाने (संजय दत्त) स्वत: ही स्क्रिप्ट वाचली आहे, तो यात काम करण्यास उत्सूक आहे. भूमी आताच्या काळातील कथा आहे, संजय दत्त आमच्याच चित्रपटातून कमबॅक करेल हे नक्की. आमचा चित्रपटाची शूटिंग फेब्रुवारी २०१७ पासून उत्तर प्रदेशात सुरू होणार आहे.
यापूर्वी विधू विनोद चोपडा यांच्या मार्को या चित्रपटातून संजय दत्त पुनरागमन करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मार्कोच्या स्क्रिप्टवर काम सुरू असून, एप्रिलपासूनच आम्ही शूटिंगला सुरुवात करू असे विधू विनोद चोपडा यांनी सांगितले होते. मात्र, आता या नव्या बातमीनुसार मार्कोच्या शूटिंगपूर्वी भूमीची शूटिंग पूर्ण झाल्यावरच संजय मार्कोच्या चित्रीकरणाला सुरुवात क रेल असे दिसते.