संजय दत्त बॉलिवूडच्या या ४९ वर्षीय अभिनेत्रीसाठी शोधणार नवरदेव, स्वतःच करणार कन्यादान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:42 IST2025-03-07T12:41:15+5:302025-03-07T12:42:03+5:30
Sanjay Dutt: नुकतेच बॉलिवूडच्या ४९ वर्षीय अभिनेत्रीने संजय दत्तसोबतच्या मैत्रीवर भाष्य केले. इतकेच नाही तर तिने संजय दत्तने तिला दिलेल्या वचनाबद्दलही सांगितले.

संजय दत्त बॉलिवूडच्या या ४९ वर्षीय अभिनेत्रीसाठी शोधणार नवरदेव, स्वतःच करणार कन्यादान
बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजे संजय दत्त(Sanjay Dutt)चे अनेक किस्से ऐकायला मिळतात. त्याचे नाव बॉलिवूडच्या त्या यादीत समावेश आहे ज्यात जे कलाकार आपल्या कुटुंब आणि मित्रांची काळजी घेण्यात पुढाकार घेतात. नुकतेच बॉलिवूडच्या ४९ वर्षीय अभिनेत्रीने संजय दत्तसोबतच्या मैत्रीवर भाष्य केले. इतकेच नाही तर तिने संजय दत्तने तिला दिलेल्या वचनाबद्दलही सांगितले.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अमिषा पटेल (Amisha Patel) आहे. गदर एक प्रेम कथा फेम अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या करिअरमध्ये सुपरहिट सिनेमात काम केले आहे. तिचे चाहते सनी देओलसोबत तिच्या गदर ३ चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान तिने संजय दत्त सोबत असलेल्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. अमिषा पटेल आणि संजय दत्तची जोडी तथास्तु आणि चतुर सिंग टू स्टार सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसली आहे. यामुळेच दोघांची मैत्री खूप घट्ट असून संजय दत्तनेही अभिनेत्रीचे लग्न लावून देणार असल्याचे वचन दिले आहे.
संजय दत्त अभिनेत्रीच्या बाबतीत आहे पझेसिव्ह
अमिषा पटेलने संजय दत्त प्रोटेक्टिव्ह आणि पझेसिव्ह असल्याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, हा माझ्या वाढदिवसाचा खास क्षण होता, जो मी संजूच्या घरी साजरा केला होता. त्याचा स्वभाव खूपच प्रोटेक्टिव्ह आणि पझेसिव्ह आहे. मी जेव्हापण त्याच्या घरी जाते तेव्हा मला छोटे किंवा वेस्टर्न कपडे परिधान करण्यासाठी परवानगी नाही. मी त्यांच्याकडे जायचं असेल तर पंजाबी ड्रेस परिधान करते.
संजय दत्तने अमिषाला दिलंय हे वचन
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अमिषाने सांगितले की, संजू मला नेहमीच सांगतो की, तू सिनेइंडस्ट्रीतील निरागस अभिनेत्री आहे. त्यामुळे मी तुझ्यासाठी चांगला वर शोधून आणेन. तुझे लग्न लावून देईन आणि कन्यादान करेन. अमिषाने असेही सांगितले की संजय दत्त नेहमीच तिची काळजी घेतो.