‘संजू’मध्ये संजय दत्तच्या कोणत्या जुन्या मित्राची भूमिका साकारतोय विकी कौशल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 16:21 IST2018-06-06T10:51:24+5:302018-06-06T16:21:24+5:30
येत्या २९ तारखेला एक बहुप्रतिक्षीत चित्रपट रिलीज होतोय. संजय दत्तच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. आम्ही कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोय, ...

‘संजू’मध्ये संजय दत्तच्या कोणत्या जुन्या मित्राची भूमिका साकारतोय विकी कौशल?
य त्या २९ तारखेला एक बहुप्रतिक्षीत चित्रपट रिलीज होतोय. संजय दत्तच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. आम्ही कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते ‘संजू’ या चित्रपटाबद्दल. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरला संजय दत्तची भूमिका साकारताना आपण बघू शकणार आहोत. रणबीरशिवाय परेश रावल, मनीषा कोईराला, सोनम कपूर, दिया मिर्झा यांच्याही भूमिका आहेत. अलीकडे आलिया भट्टसोबत ‘राजी’मध्ये दिसलेला अभिनेता विकी कौशल हाही या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. संजय दत्तच्या एका अतिशय जवळच्या मित्राची भूमिका तो साकारताना दिसणार आहे. आता संजयचा हा जवळचा मित्र कुठला? तो बॉलिवूडमधला आहे की बाहेरचा? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर खुद्द विकीनेचं ही उत्सुकता शमवली आहे. होय, विकी साकारणार असलेली भूमिका कुणाची, याबद्दल त्याने सविस्तर माहिती दिली.
त्याने सांगितले की, ‘संजू’मध्ये मी साकारत असलेली भूमिका संजय दत्त यांचा मित्र परेश याची आहे. परेश न्यूयॉर्कमध्ये राहतो. तो संजयचा अतिशय जुना आणि जवळचा मित्र आहे. मी परेशला एकदा भेटलो होतो. त्याने मला संजय व त्याच्या मैत्रीचे अनेक किस्से ऐकवले होते. परेश गुजराती आहे. त्यामुळे त्याची भूमिका साकारण्यासाठी मला बरीच तयारी करावी लागली. गुजराती थिएटरच्या डिम्पल शाह यांनी मला गुजराती भाषेतील बारकावे शिकवले. ही भूमिका साकारण्यापूर्वी ती तीन ते चार दिवस सूरतेतही राहिलो. सूरतच्या डायमंड बाजारात मी बराच वेळ घालवला. तेथे माझा लाईव्ह वर्कशॉप झाला.
रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव कसा राहिला, हेही त्याने सांगितले.
ALSO READ : ‘संजू’मधील न्यूड सीनबद्दल रणबीर कपूरने केला खुलासा
रणबीर एक मॅजिकल व्यक्ती आहे. त्याने संजय दत्त हे पात्र इतके कोळून प्याले होते की, सेटवरही तो रणबीर कमी अन् संजय दत्तचं अधिक भासायचा. मी कधीच रणबीरला रिटेक देताना बघितले नाही. इंडस्ट्रीबद्दलची बित्तंबातमी त्याच्याकडे असते, असे त्याने सांगितले.