संजय दत्तने सोडला अक्षय कुमारचा 'वेलकम ३'! शूटिंगही केलं होतं सुरू; कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 06:17 PM2024-05-21T18:17:45+5:302024-05-21T18:18:21+5:30

Sanjay Dutt : 'वेलकम टू द जंगल' या या वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटातून संजय दत्तने काढता पाय घेतला आहे. गेल्या वर्षीच संजय अक्षय कुमारच्या या मल्टीस्टारर चित्रपटात सामील झाला होता.

Sanjay Dutt left Akshay Kumar's 'Welcome 3'! Shooting had also started; The reason came to the fore | संजय दत्तने सोडला अक्षय कुमारचा 'वेलकम ३'! शूटिंगही केलं होतं सुरू; कारण आलं समोर

संजय दत्तने सोडला अक्षय कुमारचा 'वेलकम ३'! शूटिंगही केलं होतं सुरू; कारण आलं समोर

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेल्या संजय दत्त(Sanjay Dutt)ला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असते. साउथमधील अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग असलेला संजय दत्त अलिकडेच तेलुगू चित्रपट 'डबल स्मार्ट'च्या टीझरमध्ये दिसला. या चित्रपटातील खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या संजयचा टीझरमधील लूक प्रेक्षकांना आवडला आहे. आता संजयच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 'वेलकम टू द जंगल' (Welcome To The Jungle) या या वर्षातील सर्वात मोठ्या बॉलीवूड चित्रपटातून त्याने काढता पाय घेतला आहे. गेल्या वर्षीच संजय अक्षय कुमारच्या या मल्टीस्टारर चित्रपटात सामील झाला होता.

अक्षय कुमारचा 'वेलकम' हा बॉलिवूडमधील आयकॉनिक कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. आता या फ्रँचायझीचा तिसरा भाग बनवला जात आहे, जो एक मोठा मल्टीस्टारर प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात अक्षयसोबत बॉलिवूडची अनेक मोठी नावे दिसणार आहेत आणि त्यात संजय दत्तचेही नाव होते. आता पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, संजय दत्तने हा चित्रपट सोडला आहे. प्रकृतीच्या समस्येमुळे संजयने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, अक्षय मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगला संजयनेही सुरुवातही केली होती. पण त्याने मढ आयलंडमध्ये फक्त एक दिवस शूट केले. 

या कारणामुळे संजूबाबाने सोडला सिनेमा

सूत्राने सांगितले की, संजयच्या व्यक्तिरेखेला चित्रपटात बरेच ॲक्शन सीन करावे लागतील, त्यामुळे त्याची तब्येत लक्षात घेऊन संजयने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. अक्षयने चित्रपटातील कलाकारांमध्ये संजय दत्तचे स्वागत केले, अक्षय कुमारने 'वेलकम टू द जंगल'च्या कलाकारांमध्ये संजय दत्तच्या आगमनाची घोषणा केली होती. त्याने इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या शूटचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो घोडेस्वारी करताना दिसत होता. संजय दत्त त्याच्या मागे दुचाकीवरून येताना दिसला होता.

वर्कफ्रंट
संजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो अजूनही अक्षयसोबत 'हाऊसफुल ५' चित्रपटाचा भाग आहे. याशिवाय तो 'केडी- द डेव्हिल' या कन्नड चित्रपटाचाही भाग असणार आहे. प्रभासच्या 'द राजा साहेब' या आगामी चित्रपटाचाही संजय दत्त एक भाग असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. १४ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'डबल स्मार्ट' या तेलगू चित्रपटात संजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Sanjay Dutt left Akshay Kumar's 'Welcome 3'! Shooting had also started; The reason came to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.