सिनेमाच्या शुटिंगदरम्यान बॉलिवूडचा 'खलनायक' जखमी; संजय दत्तवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 17:38 IST2023-04-12T17:37:49+5:302023-04-12T17:38:27+5:30
या अपघातानंतर संजय दत्तचे चाहते खूप चिंतेत आहेत. अभिनेता लवकर बरा व्हावा यासाठी ते प्रार्थना करतायेत.

सिनेमाच्या शुटिंगदरम्यान बॉलिवूडचा 'खलनायक' जखमी; संजय दत्तवर उपचार सुरू
संजय दत्त बॉलिवूडमध्ये त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत, मात्र अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. शूटिंगदरम्यान संजय दत्त जखमी झाला आहे. अभिनेता सध्या त्याच्या आगामी कन्नड चित्रपट 'केडी: द डेव्हिल' साठी बेंगळुरूच्या परिसरात शूटिंग करत आहे. हा अपघात झाला तेव्हा तो चित्रपटातील ब्लास्ट सिक्वेन्सचे शूटिंग करत होता.
रिपोर्टनुसार, स्फोटाचा सीन शूट करताना संजय दत्त गंभीर जखमी झाला. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या हाताला, चेहऱ्याला आणि कोपरावर जखमा झाल्या आहेत. तो फाईट मास्टर रवि वर्मा यांच्या KD: The Devil या चित्रपटासाठी फाईट सीनची तयारी करत होता. याचदरम्यान हा अपघात झाला. या घटनेनंतर संजय दत्तचे चाहते खूप चिंतेत आहेत. अभिनेता लवकर बरा व्हावा यासाठी ते प्रार्थना करतायेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर संजय दत्त KGF चॅप्टर 1 आणि 2 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटात त्याच्यासोबत रवीना टंडन दिसली होती. 'केडी: द डेव्हिल' या कन्नड चित्रपटात संजय पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्त अखेरचा 'शमशेरा' चित्रपटात रणबीर कपूर आणि वाणी कपूरसोबत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. 'शमशेरा' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.