संजय दत्तची दुसरी पत्नी झाली कंगाल; लिव्ह इन पार्टनर लिएंडर पेसने पैसे देण्यास दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 15:12 IST2017-09-28T09:42:19+5:302017-09-28T15:12:19+5:30

अभिनेता संजय दत्तची एक्स वाइफ आणि मॉडेल रिया पिल्लई पुन्हा एकदा तिच्या लिव्ह इन पार्टनर लिएंडर पेससोबतच्या कायदेशीर लढाईमुळे ...

Sanjay Dutt gets second wife; Live-in partner Leander Paes refuses to donate money! | संजय दत्तची दुसरी पत्नी झाली कंगाल; लिव्ह इन पार्टनर लिएंडर पेसने पैसे देण्यास दिला नकार!

संजय दत्तची दुसरी पत्नी झाली कंगाल; लिव्ह इन पार्टनर लिएंडर पेसने पैसे देण्यास दिला नकार!

िनेता संजय दत्तची एक्स वाइफ आणि मॉडेल रिया पिल्लई पुन्हा एकदा तिच्या लिव्ह इन पार्टनर लिएंडर पेससोबतच्या कायदेशीर लढाईमुळे चर्चेत आली आहे. रियाने लिएंडरवर घरगुती हिंसाचार आणि दहा वर्षांची मुलगी आयनाकरिता पोटगी देण्यावरून गुन्हा दाखल केला आहे. नुकतीच रिया बांद्रा येथील न्यायालयात पोहोचली होती. वास्तविक लिएंडर दर महिन्याला रियाला पोटगीपोटी दीड लाख रूपये देत असतो. वास्तविक रियाने लिएंडरकडून २.६२ लाख रूपयांची मागणी केली होती. १.८७ लाख मुलीचा मेडिकल खर्च आणि ७५ हजार स्वत:साठी अशा पद्धतीचे मागणी तिने न्यायालयामार्फत लिएंडरकडे केली होती. परंतु लिएंडर तिला केवळ १.५ लाख रूपयेच पोटगीपोटी देत होता. मात्र मुलीचा मेडिकल खर्च करताना रिया अक्षरश: कंगाल झाली असून, ती खूपच हलाखीच्या जिने जगत आहे. 

दरम्यान, बांद्रा न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान रियाने सांगितले की, मी गेल्या काही काळापासून मित्रांकडून पैसे उधार घेऊन जगत आहे. नुकतेच तिने तिच्या दोन मित्रांकडून ५० हजार रूपये घेतले. त्याचबरोबर तिच्याकडे जमा असलेली सर्व रक्कम तिने खर्च केली आहे. या सुनावणीदरम्यान लिएंडर न्यायालयात उपस्थित नव्हता. २००९ पासून रिया केवळ घरच सांभाळत नाही, तर मुलीचा सांभाळही करीत आहे. २०१४ पासून लिएंडरने तिला १.५ लाख रूपये देण्यास सुरुवात केली. रिया आणि लिएंडरची मुलगी आयनाला ब्रेन ट्यूमर असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तिच्या उपचारावर खर्च करताना रियाची अक्षरश: दमछाक होत आहे. दरम्यान, जेव्हा आयनाला ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले होते, तेव्हा हे दोघे एकत्र येतील असे लोकांना वाटत होते. मात्र तसे घडले नाही. 



वास्तविक चर्चा अशी आहे की, लिएंडरला आता रिया आणि आयनासोबत राहण्यास कुठल्याही प्रकारचा रस नाही. त्यामुळेच तो सातत्याने कायदेशीर लढाईचा सामना करीत आहे. वास्तविक त्याने रियाशी लग्न केले नाही. त्यामुळे त्यांंच्यात कुठल्याही प्रकारचे पती-पत्नीचे नाते नाही. त्यामुळे रियाची प्रत्येक मागणी पूर्ण करणे त्याच्यावर बंधनकारक नाही. दरम्यान, या सुनावणीनंतर रियाच्या एका क्लोज फ्रेंडने मीडियाशी बोलताना सांगितले की, ‘लिएंडर एक ज्युनिअर टेनिस प्लेअरला डेट करीत आहे. २००५ पासून तो रियासोबत एका पतीसारखा राहत होता. अशात त्याचे हे वागणे पूर्णत: चुकीचे आहे. दोघांची एक मुलगी आहे. शिवाय त्याच्याविरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी रियाकडे बरेचसे पुरावे आहेत.’

१९८७ मध्ये अभिनेता संजय दत्तने रिचा शर्माशी लग्न केले होते. परंतु कॅन्सरच्या आजारामुळे १९९६ मध्ये तिचे निधन झाले. संजय आणि रिचा यांची त्रिशाला नावाची मुलगी असून, सध्या ती अमेरिकेत राहत आहे. रिचाच्या मृत्यूनंतर संजूबाबाच्या आयुष्यात मॉडेल रिया पिल्लईची एंट्री झाली. १९९३ नंतर जेव्हा संजूबाबाला जेलमध्ये जावे लागले, तेव्हा रियानेच त्याला पावलोपावली साथ दिली होती. पुढे १९९८ मध्ये संजय दत्तने रिया पिल्लईशी लग्न केले. मात्र काही कारणास्तव संजय दत्तसोबतचे तिचे नाते फार काळ टिकले नाही. संजय दत्तशी नाते तुटल्यानंतर रिया टेनिसपटू लिएंडर पेसच्या संपर्कात आली. काहीकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. २००५ मध्ये संजय दत्तशी कायदेशीरीत्या विभक्त झाल्यानंतर रिया आणि पेसने फॅमिली प्लॅनिंग केले. त्यातूनच २००६ मध्ये आयनाचा जन्म झाला. आठ वर्षे एकत्र राहिल्यानंतर हे दोघे विभक्त झाले. सध्या त्यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. 

Web Title: Sanjay Dutt gets second wife; Live-in partner Leander Paes refuses to donate money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.