संजय दत्तने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज, आलिशान गाडीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 10:05 IST2025-08-29T09:47:46+5:302025-08-29T10:05:25+5:30

गणेशोत्सवात अनेक जण नवीन गाडी, घर किंवा सोन्याच्या वस्तूंची खरेदी करतात. अभिनेता संजय दत्तनेही नवी कोरी गाडी घरी आणली आहे.

Sanjay Dutt Buys Mercedes Maybach Gls Worth 3 Crore On Ganesh Chaturthi 2025 | संजय दत्तने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज, आलिशान गाडीचा व्हिडीओ व्हायरल

संजय दत्तने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज, आलिशान गाडीचा व्हिडीओ व्हायरल

Sanjay Dutt Buys Brand New Luxury Mercedes: बॉलिवूडचा 'बाबा' म्हणजेच संजय दत्त त्याच्या दमदार अभिनयासोबतच त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. नुकतेच त्यानं आपल्या कार कलेक्शनमध्ये एका नव्या महागड्या गाडीची भर घातली आहे. संजय दत्तने नवी कोरी मर्सिडीज मेबॅक GLS600 गाडी खरेदी केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संजय दत्तने ही आलिशान कार खरेदी केली. या गाडीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संजय दत्त त्याच्या मुंबईतील घराबाहेर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या चकचकीत गाडीसोबत दिसत आहेत. यावेळी संजय दत्त कॅज्युअल लूकमध्ये खूपच स्टायलिश दिसत होता. गाडीच्या बोनेटवर आणि ग्रिलवर झेंडूच्या फुलांची माळ घातलेली असून, गाडीचा लूक अधिक आकर्षक वाटतोय. संजय दत्तच्या या नव्या मर्सिडीज मेबॅक GLS600 ची किंमत तब्बल ३.७१ कोटी रुपये आहे.



संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तो शेवटचा 'द भूतनी' या चित्रपटात दिसला होता. आता त्यांचे चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. संजय दत्त लवकरच 'बागी ४' या चित्रपटात दिसणार आहेत. साजिद नाडियाडवाला निर्मित या चित्रपटात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर, २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Sanjay Dutt Buys Mercedes Maybach Gls Worth 3 Crore On Ganesh Chaturthi 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.