Sanjay Dutt Birthday Special : KGF 2 मधील संजय दत्तचा लूक झाला लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 15:54 IST2020-07-29T15:53:17+5:302020-07-29T15:54:06+5:30
संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्ताने KGF 2 या चित्रपटातील त्याचा लूक लाँच केला आहे. यात तो क्रुर राजा अधिराची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Sanjay Dutt Birthday Special : KGF 2 मधील संजय दत्तचा लूक झाला लाँच
'केजीएफ: चॅप्टर 1'मध्ये सु परस्टार यशच्या विस्मयकारक प्रदर्शनाने थक्क झाल्यानंतर त्याचे चाहते 'केजीएफ: चॅप्टर 2' मध्ये त्यांच्या लाडक्या रॉकी भाईची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ‘केजीएफ: चॅप्टर 2’मध्ये यश मुख्य भूमिकेत असून त्याच्यासमोर अभिनेता संजय दत्त असणार आहे. संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटातील त्याचा लूक लाँच केला आहे. यात तो क्रुर राजा अधिराची भूमिका साकारताना दिसणार आहे.संजय दत्तच्या वाढदिवशी अधिराचा हा लूक संजय दत्तच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरली आहे.
रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेन्मेंटसह निर्मात्यांनी यापूर्वी जाहीर केले होते की ते 29 जुलै, 2020 रोजी ‘अधिरा’चे अनावरण करतील. त्यांच्या सोशल मीडियावरुन एक्सेल एंटरटेनमेंट आणि निर्माता रितेश सिधवानी यांनी अधीराचा लूक शेअर केला आहे.
केजीएफ चॅप्टर 1 ला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता, ज्याने केवळ भारतातच नव्हे तर सर्वत्र कोट्यवधी लोकांची मने जिंकली होती. निर्मात्यांनी वर्षभरापूर्वी केजीएफ चॅप्टर २ चे पहिले पोस्टर लाँच केले होते तेव्हा या रहस्यमयी अधीराची तोंडओळख करुन दिली होती.
पहिला चॅप्टरमध्ये यशच्या रॉकीने त्याच्या प्रतिस्पर्धी गरुडचा वध केला, ज्याने गुलामगिरी आणि क्रूरपणाने कोलारच्या सोन्याच्या खाणींवर नियंत्रण ठेवले होते. घटना घडल्यानंतर, अधीराने असे वचन दिले होते की गरुडा जिवंत आहे तोपर्यंत सोन्याच्या खाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार नाही. केजीएफच्या दुसऱ्या भागात आपल्याला अधीरा आणि रॉकी यांना सोन्याच्या खाणींवर जोरदार संघर्ष करत असताना दिसतील.
केजीएफ चॅप्टर 2, एका बाजूला प्रचंड मोठ्या अवकाशात तयार होणारा असा बहुप्रतीक्षित चित्रपट नेत्रसुखद आणि आश्चर्यजनक अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञानाने समृद्ध होत आहे तर दुसऱ्या बाजूला यामध्ये सुपर रॉकिंग सुपरस्टार यश, संजय दत्त, रवीना टंडन यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या शानदार भूमिका असणार आहेत.विजय किलागंदुरद्वारे निर्मित आणि प्रशांत नीलद्वारे दिग्दर्शित, केजीएफ 2ला एक्सेल एंटरटेनमेंटसारख्या प्रतिष्ठित नावांसोबत आणण्यात येत असून हा कन्नड, तमिळ, तेलगु, मल्याळम आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणारा बहुभाषी चित्रपट आहे.