या तारखेला रिलीज होणार संजय दत्तचा बायोपिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 12:28 IST2018-01-05T06:47:32+5:302018-01-05T12:28:33+5:30
संजय दत्तच्या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारताना दिसणार आहे. रणबीर कपूर या बायोपिकमध्ये तीन वेगवेगळ्या अवतारात दिसणार ...

या तारखेला रिलीज होणार संजय दत्तचा बायोपिक
स जय दत्तच्या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारताना दिसणार आहे. रणबीर कपूर या बायोपिकमध्ये तीन वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे. एक म्हणजे, संजय दत्तचा बॉलिवूड डेब्यू, मग त्याला लागलेले ड्रग्सचे व्यसन आणि नंतर तुरुंगातील शिक्षा. साहजिक रणबीर या सर्व अवतारात कसा दिसतो, याची उत्सुकता आहेच.
आधी हा चित्रपट मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र नुकतेच राजकुमार हिराणी यांनी चित्रपटाची रिलीज 29 जून केली असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक सीन परफेक्ट व्हावा, अशी रणबीरची इच्छा होती. त्याचमुळे ऐनवेळी रणबीरने काही सीन्सचे शूटींग पुन्हा करायला लावले. हा एक मोठा चित्रपट आहे, हे रणबीर जाणून आहे आणि कदाचित म्हणून त्याला सगळे काही अगदी परफेक्ट हवे आहे. केले त्यापेक्षाही परफेक्ट त्याला करायचे आहे. रणबीरने ऐनवेळी सुचवलेले बदल, हा याच परफेक्शनपर्यंत जाण्याचा प्रयत्न होता. या चित्रपटासाठी रणबीरने प्रचंड मेहनत घेतली आहे. संजय दत्त सारखे हुबेहुबे दिसण्यासाठी रणबीर कपूरने आपले वजन ही वाढवले होते.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते परेश रावल हे संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री मनीषा कोईराला संजयची आई नर्गिस दत्त यांची व्यक्तिरेखा जिवंत करणार आहे.
ALSO READ : करण जोहर रणबीर कपूरवर संतापतो तेव्हा...!!
अभिनेत्री दिया मिर्झा राजकुमार हिराणी दिग्दर्शित संजय दत्तच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाला घेऊन दिया उत्सहित आहे. दियाला या गोष्टीची चिंता नाही की हा चित्रपट तिच्या करिअरला कोणत्या दिशेले घेऊन जाईल. दियाने या चित्रपटात संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तची भूमिका साकारली आहे.
दिया म्हणाली, ''मी संजय दत्तच्या बायोपिकला घेऊन आणि त्यातल्या कामाला घेऊन खूप उत्साहित आहे. मी यात साकारल्या भूमिकेला घेऊन खूप विचार करत नाही आहे की ही भूमिका माझ्या करिअरला कुठे घेऊन जाईल.