‘पद्मावती’ मध्ये पाहुण्या भूमिकेत दिसणार संजय दत्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 18:49 IST2017-01-11T18:49:07+5:302017-01-11T18:49:44+5:30

‘बॉलिवूडचा मुन्नाभाई’ संजय दत्त हा दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे संजूबाबाच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनणार असून, त्यात रणबीर ...

Sanjay Dutt to appear in guest role in Padmavati? | ‘पद्मावती’ मध्ये पाहुण्या भूमिकेत दिसणार संजय दत्त?

‘पद्मावती’ मध्ये पाहुण्या भूमिकेत दिसणार संजय दत्त?

ॉलिवूडचा मुन्नाभाई’ संजय दत्त हा दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे संजूबाबाच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनणार असून, त्यात रणबीर कपूर हा संजूबाबाच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरे कारण म्हणजे तो भन्साळींच्या ‘पद्मावती’ चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,‘ निर्मात्यांनी संजूबाबाला भेटण्यासाठी ‘पद्मावती’च्या सेटवर बोलावले होते, असे कळतेय.’ 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाची चर्चा वेगवेगळया कारणांनी ‘बी टाऊन’ मध्ये सुरूच असते. दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिकेतील या चित्रपटामुळे दीपिका-रणवीर ही जोडी ‘बाजीराव मस्तानी’ नंतर पुन्हा एकदा एकत्र आली आहे. मात्र, आता खुशखबर अशीही आहे की, चाहत्यांचा लाडका संजूबाबा देखील या सर्वांसोबत एका छोट्याशा भूमिकेसाठी दिसण्याची शक्यता आहे. सेटवरील सूत्रांकडून कळाले की, ‘पद्मावती’ मध्ये संजय दत्तचे पाहुण्या भूमिकेत कास्टिंग करायचे.‘ त्यानंतर बी टाऊनमध्ये चर्चेला उधाण आले. संजय दत्तने याविषयी बोलणे टाळणेच पसंत केले. थोडक्यात काय, संजूबाबा जर पद्मावती मध्ये दिसणार असेल तर चित्रपटाला नक्कीच अजून रंगत येणार, असे दिसतेय.

Web Title: Sanjay Dutt to appear in guest role in Padmavati?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.