संजय दत्त या गोष्टीमुळे त्रिशालावर आहे नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 11:07 IST2017-10-19T05:35:24+5:302017-10-19T11:07:31+5:30
संजय दत्तने नुकतेच भूमी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले नसले तरी ...

संजय दत्त या गोष्टीमुळे त्रिशालावर आहे नाराज
स जय दत्तने नुकतेच भूमी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले नसले तरी या चित्रपटातील संजय दत्तच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. संजय दत्त आता साहेब बिवी और गँगस्टर या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकऱणालाही त्याने सुरुवात केली आहे. संजय हा प्रेक्षकांचा आवडता हिरो असला तरी तो सोशल मीडियापासून नेहमीच दूर राहातो. पण त्याची पत्नी मान्यता दत्त ही नेहमीच सोशल मीडियीवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच पोस्ट करत असते. त्यामुळे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला अनेक फॉलोव्हर्स आहेत.
मान्यता दत्तप्रमाणे आता संजय दत्तची मुलगी त्रिशला दत्त देखील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह झाली आहे. ती सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत आहे. त्या फोटोंमध्ये अनेक बोल्ड फोटोंचा समावेश आहे. त्रिशालाच्या या फोटोंची चांगलीच चर्चा होत आहे. त्रिशाला ही काही वर्षांपर्यंत चांगलीच वजनदार होती. पण आता तिने तिचे वजन कमी केले असून ती अतिशय सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिचे फोटो लोकांना आवडत आहेत. त्यामुळे तिच्या फॉलोव्हर्समध्ये देखील वाढ होत आहे. पण त्रिशालाने नेहमीच लोकांपासून आणि बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहावे असे संजय दत्तचे म्हणणे आहे. त्रिशालाला चित्रपटात काम कऱण्याची इच्छा आहे. पण त्रिशालाने चित्रपटांमध्ये येऊ नये असे संजय दत्तचे मत असल्याचे म्हटले जाते. त्रिशाला सध्या तिचे खूपच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. तसेच सोशल मीडियावर ती खूपच अॅक्टिव्ह आहे. ही गोष्ट संजय दत्तला आवडत नसल्याने तो तिच्यावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिल पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. संजय दत्तने १९८७ साली ऋचासोबत लग्न केले होते. लग्नाच्या वर्षभरातच त्रिशाला त्यांच्या आयुष्यात आली. १९९६ मध्ये ब्रेन ट्युमरने ऋचाचे निधन झाले.
Also Read : संजय दत्तने या दिग्दर्शकासोबत काम करण्यास दिला नकार !