पहाटे चारवाजेपर्यंत रंगली संजय दत्त अन् सलमान खानची ‘सीक्रेट मीटिंग’! वाचा सविस्तर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 12:55 IST2017-09-25T07:25:09+5:302017-09-25T12:55:09+5:30
गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि संजय दत्त यांच्या मैत्रीत ‘दरार’ पडण्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्यात. आधी सलमान व ...

पहाटे चारवाजेपर्यंत रंगली संजय दत्त अन् सलमान खानची ‘सीक्रेट मीटिंग’! वाचा सविस्तर!!
ग ल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि संजय दत्त यांच्या मैत्रीत ‘दरार’ पडण्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्यात. आधी सलमान व संजय खूप चांगले मित्र होते. पण मध्यंतरी दोघांचेही फाटल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या. काल-परवा ‘भूमी’च्या स्पेशल स्क्रिनिंगला सलमानला बोलवण्यात आले नाही,अशीही चर्चा कानोकानी झाली. सलमान व संजयची मैत्री तुटण्यामाग अनेक कारणे सांगितली गेली.
संजय तुरुंगातून सुटल्यावर सगळे त्याला भेटायला गेले. पण सलमान गेला नाही. यामुळे संजूबाबा सलमानवर नाराज असल्याचे बोलले गेले. याशिवाय सलमानची मॅनेजर रेशमा शेट्टी हिच्यावरून या दोघांमध्ये वाद झाला, असेही सांगितल्या गेले. संजयला सलमानने त्याची मॅनेजर रेशमा शेट्टी याची सेवा घेण्याचा सल्ला दिला होता. रेशमा तुझे करिअर मार्गी लावेल, असा विश्वास सलमानने दिला होता. त्यानुसार, संजयने रेशमाची सेवा घेतली. पण यानंतरही अनेक महिने कुठलेच काम मिळत नसल्याचे पाहून संजयने रेशमाची हकालपट्टी केली होती. यामुळे सलमान नाराज झाला होता. तेव्हापासून सलमान व संजय यांच्यात बिनसल्याची चर्चा होती.
पण डीएनएचे वृत्त खरे मानाल तर, सलमान व संजयचा वाद हा केवळ मीडियाने क्रिएट केलेला वाद आहे. प्रत्यक्षात दोघे आजही आधीसारखेच मित्र आहेत. ‘भूमी’च्या स्पेशल स्क्रिनिंगला सलमानला बोलवले नाही, ही बातमीही तेवढीच कपोलकल्पित होती. कारण ‘भूमी’ रिलीज झाल्याच्या दुस-याच दिवशी संजय दत्त सलमानला भेटायला त्याच्या घरी गेला होता. त्यादिवशी पहाटे चारपर्यंत संजय व सलमान सोबत होते. त्यांचे कॉमन फ्रेन्डही यावेळी हजर होते. यावेळी सगळ्यांनी मनसोक्त गप्पा केल्या. जुन्या आठवणी ताज्या केल्या आणि धम्माल केली. यावेळी हजर असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान व संजय या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा आॅक्वर्डनेस नव्हता. सूत्रांच्या मते, केवळ पब्लिकमध्ये सोबत दिसत नाहीत, म्हणून दोघांमध्ये बिनसले असा तर्क काढणे चूक आहे. सलमान व संजय दोघांनाही दिखावा करणे आवडत नाही. केवळ मीडियासमोर गळ्यात गळा घालून मिरवणे, यापलीकडे त्यांच्या मैत्रीचे संदर्भ वेगळे आहेत.
ALSO READ : Bhoomi movie review : संजय दत्तच्या फॅन्सची घोर निराशा