अरेच्चा! ही तर माधुरी? संजय दत्तचा पत्नीसोबत रोमँटिक डान्स, नेटकऱ्यांना वाटली 'धकधक गर्ल'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:05 IST2025-06-12T15:04:02+5:302025-06-12T15:05:12+5:30

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना पाहताच क्षणी आधी ती माधुरी असल्याचाच भास होत आहे.

sanjay dutt and manyata dutt romantic dance video netizend thought it was madhuri | अरेच्चा! ही तर माधुरी? संजय दत्तचा पत्नीसोबत रोमँटिक डान्स, नेटकऱ्यांना वाटली 'धकधक गर्ल'!

अरेच्चा! ही तर माधुरी? संजय दत्तचा पत्नीसोबत रोमँटिक डान्स, नेटकऱ्यांना वाटली 'धकधक गर्ल'!

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt)  त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. पत्नी मान्यता दत्त आणि मुलांसह त्याचे अनेकदा व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र तो जमेल तितकं आपले फॅमिलीला खाजगी ठेवतो. आता नुकतंच संजय दत्तचा पत्नी मान्यता सोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये दोघं डान्स करताना दिसत आहेत. मात्र नेटकऱ्यांना पाहताच क्षणी आधी ती माधुरी असल्याचाच भास होत आहे. व्हिडिओ पाहून मान्यता आणि माधुरीमध्ये कमालीचं साम्य दिसत आहे.

संजय दत्त आणि मान्यता दत्तचा हाच तो व्हिडिओ आहे. दोघंही एका संगीत फंक्शनमध्ये डान्स करत आहेत. त्यांची जोडी अगदीच रोमँटिक आणि छान दिसत आहे. संजय दत्तच्याच 'वास्तव' सिनेमातलं 'मैरी दुनिया है' या गाण्यावर ते नाचत आहेत. संजय मान्यताच्या कपाळावर किस करतो आणि समोर बसलेले लोक त्यांना दाद देतात. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. संजय दत्त आणि मान्यता यांचा हा परफॉर्मन्स स्टॅलियन ग्रुपच्या सोनम फेबियानी यांच्या बहीण सरीना वासवानीच्या संगीत सोहळ्यातला आहे. दोघांनी रॉयल ब्लू रंगाचा आऊटफिट घातला आहे. मान्यताने भरजरी लेहेंगा परिधान केला आहे ज्यात ती सुंदर दिसत आहे.


हा व्हिडिओ इतका व्हायरल होण्यामागे कारणही आहे. कारण अनेकांना व्हिडिओ पाहताच क्षणी काही सेकंद ती संजयसोबत माधुरी दीक्षित असल्याचाच भास होत आहे. एका युजरने लिहिले, 'पहिल्या लूकमध्ये माधुरीच वाटली'. तर दुसऱ्याने लिहिले, 'मला वाटलं माधुरी दीक्षितच आहे'.

संजय दत्त आणि माधुरी दीक्षितचं ९० च्या दशकात अफेअर होतं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते. 'साजन','खलनायक' या सिनेमांमध्ये ते एक्तर दिसले होते. दोन्ही सिनेमे खूप गाजले होते आणि त्यांची जोडीही लोकप्रिय झाली होती. मात्र नंतर काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. बऱ्याच वर्षांनी ते 'कलंक' सिनेमात एकत्र झळकले होते. 

Web Title: sanjay dutt and manyata dutt romantic dance video netizend thought it was madhuri