संजय दत्तने वयाच्या 65 व्या वर्षी पुन्हा घेतले सातफेरे; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:39 IST2024-10-09T13:38:17+5:302024-10-09T13:39:10+5:30

संजय दत्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Sanjay Dutt And Maanayata Took Saat Phere In Their Balcony During Video Viral | संजय दत्तने वयाच्या 65 व्या वर्षी पुन्हा घेतले सातफेरे; Video व्हायरल

संजय दत्तने वयाच्या 65 व्या वर्षी पुन्हा घेतले सातफेरे; Video व्हायरल

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडच्या टॉप अभिनेता फक्त सिनेमांमुळेच नाही तर, अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आला. यातच अभिनेता संजय दत्त पुन्हा लग्न केले असल्याचं बोललं जात आहे.

संजय दत्तचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये संजय दत्त त्याची पत्नी मान्यता दत्तसोबत फेरे घेताना पाहायला मिळतोय. यज्ञाभोवती हे दोघेही फेरे घालताना दिसत आहे. यावेळी दोघेही अगदी पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळाले. संजय दत्त भगव्या रंगात तर मान्यताने व्हाईट सुट परिधान केलाय. 


नुकतंच संजय दत्तच्या घरी पुजा पार पडली. याचदरम्यानचा हा व्हिडीओ आहे.  पुजेतील एका वीधीप्रमाणे त्यांनी यज्ञाभोवती फेरे घेतले.  हा व्हिडीओ मान्यताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला तिने एक 'जय माता दी' असे जोडले आहे. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा तुफान वर्षाव केला आहे. 
 

Web Title: Sanjay Dutt And Maanayata Took Saat Phere In Their Balcony During Video Viral