थप्पड!! संजना सांघीची नवी जाहिरात पाहून पूजा बेदी भडकली, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 12:47 IST2020-12-10T12:43:59+5:302020-12-10T12:47:01+5:30

युजर्सही संतापले ; काय म्हणाली पूजा बेदी?

sanjana sanghi latest ad slammed for promoting violence against men pooja bedi calls it horrifying | थप्पड!! संजना सांघीची नवी जाहिरात पाहून पूजा बेदी भडकली, म्हणाली...

थप्पड!! संजना सांघीची नवी जाहिरात पाहून पूजा बेदी भडकली, म्हणाली...

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वी पूजाने   मिलिंद सोमणने शेअर केलेल्या न्यूड फोटोचे समर्थन केले होते.

सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ची हिरोईन संजना सांघी हिची एक जाहिरात पाहून अभिनेत्री पूजा बेदी जाम भडकलीये. सध्या संजनाची ही जाहिरात चांगलीच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर या जाहिरातीची जोरदार निंदा होतेय. ही जाहिरात पुरूषांवरील घरगुती हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप होतोय. पूजा बेदीही याच कारणाने या जाहिरातीवर भडकली आहे.

‘लायन्सगेट प्ले ’च्या या जाहिरातीत संजनासोबत एका तरूणासोबत दिसतेय. स्ट्रिमिंग अ‍ॅपवर काय पाहायचे याचा निर्णय घेणे कठीण आहे, असे तो तिला म्हणतो. यावर मग, आता काय करायचे? असा प्रतिप्रश्न करते. यावर आता तूच निर्णय घे, असे तो तिला म्हणतो. यावर ती काय करते तर एकापाठोपाठ एक त्याला 8 थप्पड लगावते आणि मग, चल यादीतील आठवा सिनेमा पाहू, असे त्याला म्हणते.

काय म्हणाली पूजा बेदी?

ही जाहिरात पाहिल्यानंतर पूजा बेदीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ही जाहिरात पाहणे भयावह आहे. पुरूषांवरील घरगुती हिंसाचार कदापि मान्य नाही. या जाहिरातीत एका पुरूषाने महिलेला 8 थोबाडीत मारल्या असत्या तर? अशा जाहिरातीला मंजूरी देता कामा नये, असे ट्विट पूजाने केले आहे.
 काही दिवसांपूर्वी पूजाने   मिलिंद सोमणने शेअर केलेल्या न्यूड फोटोचे समर्थन केले होते. मिलिंदने न्यूड रनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पूजाने मात्र या फोटोत काहीच चुकीचे नसल्याचे म्हटले होते.

पूजा बेदीला मिलिंद सोमणचा पुळका; म्हणाली, तर मग सर्व नागा साधूंना अटक करा

युजर्सही संतापले

सोशल मीडियावरच्या अनेक युजर्सनीही या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला आहे. अशा जाहिरातींवर बंदी आणायला हवी, असे एका युजरने म्हटले आहे. जाहिरातीच्या अशा फालतु कल्पना कोणाच्या डोक्यातून उगवतात आणि क्लाएंट तरी त्या कशा मान्य करतात? असा सवाल ही जाहिरात पाहून एका युजरने केला आहे.

Web Title: sanjana sanghi latest ad slammed for promoting violence against men pooja bedi calls it horrifying