pooja bedi comes in support for milind soman nude beach picture | पूजा बेदीला मिलिंद सोमणचा पुळका; म्हणाली, तर मग सर्व नागा साधूंना अटक करा

पूजा बेदीला मिलिंद सोमणचा पुळका; म्हणाली, तर मग सर्व नागा साधूंना अटक करा

ठळक मुद्दे1970 मध्ये जन्मलेली पूजा बेदी अनेकदा चर्चेत असते ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे. पूजा बेदी खरी चर्चेत आली ती 90 च्या दशकात तिने केलेल्या एका बोल्ड जाहिरातीमुळे.

गोव्याच्या बीचवर न्यूड होऊन धावणे अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण याला महागात पडले. याप्रकरणी त्याच्यावर कलम 294 अंतर्गत अश्लिल चाळे केल्याचा व कलम 67 अंतर्गत सोशल मीडियावर अश्लिल साहित्याचा प्रसार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मिलिंदने अद्याप याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  अभिनेत्री पूजा बेदी मात्र मिलिंदवरच्या या कारवाईने भडकली. मिलिंदला अगदी भरभक्कम पाठींबा देत ती त्याच्या बाजूने मैदानात उतरली. गोव्याच्या बीचवर न्यूड पळतानाच्या मिलिंदच्या फोटोत काहीही अश्लिल नाही, असा दावा तिने केला. केवळ इतकेच नाही तर न्यूडिटी क्राईम आहे तर सर्व नागा साधूंना अटक करा, असेही ती म्हणाली.

मिलिंद सोमणने 4 नोव्हेंबर रोजी आपला 55 वा वाढदिवस साजरा केला.   फिटनेससाठी ओळखल्या जाणा-या मिलिंदने गोव्याच्या बीचवर धावून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली. मात्र, धावताना त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तो पूर्ण नग्नावस्थेत धावला. मिलिंदची पत्नी अंकिता कोनवार हिने त्याची ही छबी कॅमे-यात टिपली होती. यानंतर मिलिंदने  त्याचा हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्याच्या या न्यूड फोटोचे अनेकांनी कौतुक केले होते तर अनेकांनी यावर टीकाही केली होती.

काय म्हणाली पूजा
पूजाने सोशल मीडियावर मिलिंदच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली. त्यात ती म्हणाली,‘मिलिंद सोमणच्या या कलात्मक फोटोत काहीही अश्लिल नाही. अश्लिलता पाहणा-याच्या मेंदूत अधिक असते. त्याचा गुन्हा इतकाच ती तो गुड लुकिंग, फेमस व बेंचमार्क सेट करतोय. न्यूडिटी क्राईम असेल तर सर्व नागा बाबांना अटक व्हायला हवी. केवळ राख फासल्याने ते स्वीकार्य ठरत नाहीत.’  

1970 मध्ये जन्मलेली पूजा बेदी अनेकदा चर्चेत असते ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे. पूजा बेदी खरी चर्चेत आली ती 90 च्या दशकात तिने केलेल्या एका बोल्ड जाहिरातीमुळे.कामसूत्र कंडोमच्या एका जाहिरातीत तिच्यासोबत मॉडेल मार्क रॉबिनसन दिसला होता. 1991 मध्ये पूजा बेदीने ही जाहिरात केली होती.
त्यावेळी तिच्यावर सडकून टीका झाली होती. पूजा बेदी नेहमी बोल्ड विषयांवर जाहीरपणे तिचे मत मांडत असते त्यामुळे देखील ती नेहमी चर्चेत असते. आमिर खानच्या ‘जो जीता वही सिकंदर’सोबतच विषकन्या, लुटेर, फिर तेरी कहानी याद आए, आतंक ही आतंक आणि 'शक्ति' अशा सिनेमांमध्ये देखील ती दिसली. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pooja bedi comes in support for milind soman nude beach picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.