‘मनमर्जिया’मध्ये सान्या मल्होत्राची वर्णी; हिरोही असेल नवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 19:46 IST2017-02-16T14:16:02+5:302017-02-16T19:46:02+5:30
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या सुपरहिट ‘दंगल’ या चित्रपटातून डेब्यू करणारी दिल्लीची सान्या मल्होत्रा हिला आता मुख्य भूमिका ...

‘मनमर्जिया’मध्ये सान्या मल्होत्राची वर्णी; हिरोही असेल नवा
ब लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या सुपरहिट ‘दंगल’ या चित्रपटातून डेब्यू करणारी दिल्लीची सान्या मल्होत्रा हिला आता मुख्य भूमिका मिळू लागल्या आहेत. आगामी ‘मनमर्जिया’ या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी सान्या मल्होत्राची निवड करण्यात आली असून यात बरेच बदल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक समीर शर्माची जागा अनुराग कश्यपने घेतली आहे.
दंगलमध्ये आमिर खानची मुलगी बबिताची भूमिका करणारी सान्या मल्होत्रा यापूर्वी जाहिराती व टीव्ही मालिकांत झळकली आहे. मात्र बॉलिवूडची कवाडे तिच्यासाठी दंगलच्या माध्यमातून खुली झाली. या चित्रपटात सान्याने साकारलेली बबिताची भूमिकेची चांगलीच प्रशंसा झाली आहे. यामुळे सान्याचा आगामी चित्रपट कोणता याबद्दल तिच्या चाहत्यांत उत्सुकता लागली होती. निर्माता दिग्दर्शक अरुण एल. लाल यांच्या निर्मितीत तयार होणाºया ‘मनमर्जिया’ या चित्रपटासाठी सान्याची निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. रोमाँटिक चित्रपट ‘मनमर्जिया’चे दिग्दर्शक समीर शर्मा याने आपल्या आगामी चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आयुष्यमान खुराना व भूमी पेडणेकर यांची निवड केली होती.
![]()
समीर शर्मा दिग्दर्शित ‘दम लगा के हुईशा’या चित्रपटात आयुष्यमान व भूमीने भूमिका साकारल्याने दोघांची निवड झाली असल्याचे सांगण्यात येत होते. या चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील समोर आला होता. मात्र अचानक या चित्रपटात अश्विनी अय्यर तिवारी भूमिका करणार असल्याची चर्चा सुरू झाली. आता या चित्रपटाबद्दल नव्याने आलेल्या बातमीनुसार सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निर्माता आनंद एल. राय यांनी अनुराग कश्यपला दिल्याची माहिती मिळतेय. आणखी एक मोठी बातमी म्हणजे आयुष्यमान खुरानाच्या जागी नवा चेहºयाला संधी देण्याचा विचार निर्माते करीत आहेत.