शक्ती कपूरच्या घरी वाजणार सनई चौघडे! श्रद्धा कपूर अडकणार या व्यक्तीसोबत लग्नाच्या बेडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 15:30 IST2020-08-12T15:30:11+5:302020-08-12T15:30:33+5:30
शक्ती कपूरला जावई पसंत असून लवकरच श्रद्धा कपूर लग्नाच्या बेडीत अडकू शकते.

शक्ती कपूरच्या घरी वाजणार सनई चौघडे! श्रद्धा कपूर अडकणार या व्यक्तीसोबत लग्नाच्या बेडीत
बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरने नायकापासून खलनायकाची भूमिका सक्षमपणे साकारीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आजही तो बॉलिवू़डमध्ये कार्यरत आहे. शक्ती कपूरसारखी त्याची मुलगी श्रद्धा कपूर बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवित आहे. बॉलिवूडमध्ये ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अल्पावधीतच तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांशिवाय श्रद्धा कपूर रिलेशनशीपमुळे चर्चेत असते.
श्रद्धा कपूरने करियरची सुरूवात आशिकी 2मधून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता आणि या चित्रपटातून श्रद्धा एका रात्रीत लोकप्रिय ठरली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर तिचे आणखीन काही चित्रपट रिलीज झाले. त्यानंतर तिची नावं अनेक जणांसोबत जोडली गेली. सर्वात पहिले तिचे नाव अभिनेता, दिग्दर्शक व गायक फरहान खानसोबत जोडले गेले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूरने जावेद अख्तर यांचा मुलगा व बॉलिवूड अभिनेता व दिग्दर्शक फरहान अख्तरला डेट केले होते. बराच वेळ एकमेकांना डेट केल्यानंतर या गोष्टीचा खुलासा खुद्द श्रद्धा कपूरने एका मुलाखतीत केला होता. असे वृत्त होते की शक्ती कपूर या नात्याविरोधात होते आणि जेव्हा तिला याबद्दल कळलं तेव्हा श्रद्धा खूप नाराज झाले होते. पण श्रद्धाने वडीलांचे अजिबात ऐकले नाही आणि सर्व काही सोडून फरहानसोबत लिव्ह इनमध्ये रहायला लागली. मात्र काही कारणास्तव ते वेगळे झाले आणि आता फरहान शिबानी दांडेकरला डेट करत आहे. श्रद्धा तिच्या घरी परतली असून आता तिच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीची एन्ट्री झाल्याचे समजते आहे.
श्रद्धा आता ज्या मुलाला डेट करत आहे तो कोणता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नसून एक फोटोग्राफर आहे. ती सेलिब्रेटी फोटोग्राफर रोहन सेठला डेट करत आहे. श्रद्धा व रोहन बालपणापासून एकमेकांना ओळखत आहे आणि खूप चांगले फ्रेंड्स आहेत. रोहनचे वडील बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. वडीलांच्या पावलांवर पाऊल टाकत तो देखील फोटोग्राफी करतो आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा व रोहन एकमेकांना डेट करत आहेत. शक्ती कपूरला रोहन आवडतो आणि श्रद्धाचे लग्न रोहनशी व्हावे असे शक्ती कपूरला वाटते. श्रद्धाने या वृत्तावर अद्याप दुजोरा दिलेला नाही.