गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहे समीरा रेड्डी, म्हणाली - "मानसिक आरोग्यावर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 21:29 IST2025-08-06T21:28:31+5:302025-08-06T21:29:54+5:30
Sameera Reddy : अलीकडेच समीरा रेड्डीने गोव्यातील तिच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. तिने तिच्या आयुष्यातील काही बदलांचाही उल्लेख केला आहे.

गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहे समीरा रेड्डी, म्हणाली - "मानसिक आरोग्यावर..."
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिच्या चाहत्यांसोबत प्रत्येक क्षणाच्या बातम्या शेअर करते. सध्या समीरा रेड्डी गोव्यात आहे. ती काही वर्षांपासून गोव्यात शिफ्ट झाली आहे. अलीकडेच समीरा रेड्डीने गोव्यातील तिच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. तिने तिच्या आयुष्यातील काही बदलांचाही उल्लेख केला आहे.
समीरा रेड्डी म्हणाली की, २०२० मध्ये तिच्या कुटुंबासह गोव्यात स्थलांतरित झाल्यानंतर तिला मानसिक शांती मिळाली आहे. तिचा असा विश्वास आहे की या बदलामुळे ती एक शांत व्यक्ती आणि एक चांगली आई बनली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, आता ती पूर्वीपेक्षा जास्त तणावमुक्त आणि आनंदी आहे. गोव्यात राहिल्याने तिचे जीवन सोप्पे आणि चांगले झाले आहे आणि याचा तिच्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम झाला आहे.
गोव्यात घालवलेल्या ६ वर्षांच्या आठवणींना उजाळा देत समीरा रेड्डीने इंस्टाग्रामवर लिहिले, ''गोव्यात घालवल्याचे आमचे सहावे वर्ष आहे. या शहराने मला एक व्यक्ती म्हणून खूप बदलले आहे, विशेषतः माझे मानसिक आरोग्य... मी आता एक आई आहे. जी तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आनंदाला प्रथम स्थान देते. आता मी फक्त माझ्याकडून अपेक्षित आहे. म्हणून काहीही करत नाही, तर माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी करते. बरेच लोक मला विचारतात की, मी गोव्यात का स्थलांतरित झालो, म्हणून मी माझे अनुभव शेअर करण्यासाठी एक सीरिज पोस्ट करेन. तुम्हाला काय वाटते?''
समीरा रेड्डीने हॅशटॅग वापरत 'गोवा' आणि 'मॉम लाईफ' असे लिहिले. तिचा असा विश्वास आहे की गोव्यात राहिल्याने तिचे मानसिक आरोग्य सुधारले आहे, तर तिचे कुटुंबही आनंदी आणि निरोगी वाटते, विशेषतः तिची मुले. समीरा रेड्डी आता तिच्या कुटुंबासह गोव्यातील पोरवोरिम येथे राहते. अभिनेत्री म्हणाली की गोव्यात आल्याने तिला मानसिक शांती आणि संतुलन मिळाले आहे आणि तिने हळूहळू जीवन जगण्याची कला शिकली आहे. ती यापूर्वी कधीही तिच्या आयुष्यात इतका वेळ काढू शकली नव्हती, परंतु आता ती स्वतःला वेळोवेळी थांबण्याची संधी देते.