समीरा रेड्डी म्हणाली - बॉलिवूडमधून मला 'सावळी' आणि 'उंच' म्हणून रिजेक्ट केलं जायचं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 11:02 IST2020-08-25T10:56:58+5:302020-08-25T11:02:51+5:30

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखती समीरा रेड्डी म्हणाली की, लोक तिला म्हणायचे की, ती फार सावळी आणि फार उंच आहे. या कारणाने ती सामान्य भारतीय मुलीसारखी दिसत नाही.

Sameera Reddy talks about being rejected in Bollywood because of her looks | समीरा रेड्डी म्हणाली - बॉलिवूडमधून मला 'सावळी' आणि 'उंच' म्हणून रिजेक्ट केलं जायचं!

समीरा रेड्डी म्हणाली - बॉलिवूडमधून मला 'सावळी' आणि 'उंच' म्हणून रिजेक्ट केलं जायचं!

बॉलिवूड आणि साऊथमधील काही सिनेमांमध्ये काम केलेली अभिनेत्री समीरा रेड्डीने सांगितले की, ती हिंदी सिनेमात फार यश का मिळवू शकली नाही. समीरा म्हणाली की, ती बॉलिवूडच्या ब्युटी स्टॅंडर्डनुसार ठीक नव्हती आणि सतत तिला लूक्सवरून टोमणे मारले जात होते. समीरा म्हणाली की, बॉलिवूडमध्ये लोक तिला सावळ्या रंगासाठी आणि उंचीसाठी टोमणे मारत होते.

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखती समीरा रेड्डी म्हणाली की, लोक तिला म्हणायचे की, ती फार सावळी आणि फार उंच आहे. या कारणाने ती सामान्य भारतीय मुलीसारखी दिसत नाही. समीरा म्हणाली की, तिने बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तिला यश मिळू शकलं नाही.

समीराने पुढे सांगितले की, लूक्समुळे तिला संधी मिळणं ही केवळ भेदभावाची बाब नाही तर त्याही पलिकडची बाब आहे. अनेकदा मुलींना खास किंवा आकर्षक दिसण्यासाठी आपल्या छातीवर आणि पार्श्वभागावर पॅड्स लावावे लागतात किंवा नेहमीच काहीना काही करावं लागतं.

समीरा म्हणाली की, जर या टोमण्यांमुळे तुम्ही स्वत:चा द्वेष करू लागले तर तुम्ही तणावात जाल. चांगलं होईल की तुम्ही  स्वत:वर आणि आपल्या शरीरावर नेहमी प्रेम करा. ती म्हणाली की, तिला तिच्या लूक्सवर आणि शरीरावर खूप प्रेम आहे. समीराने दुसऱ्यांदा आई होताना सोशल मीडियावर #ImperfectlyPerfect नावाने कॅम्पेन सुरू केलं होतं. ज्यात ती बॉडी इमेजच्या मुद्द्यावर बोलते आणि लोकांना आपल्या नॅच्युरल लूक्सवर प्रेम करण्याचा सल्ला देते.

मॉडलिंग केल्यानंतर समीराने २००२ मध्ये 'मैने दिल तुझको दिया' सिनमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यानंतर ती २०१२ मध्ये 'वर्धन्यका'मध्ये दिसली होती. २०१४ समीराने उद्योगपती अक्षय वर्देसोबत लग्न केलं होतं. आता समीरा दोन मुलांची आई आहे.

हे पण वाचा :

जगातली सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलीफा'मधे आहे 'या' 3 बॉलिवूड स्टार्सचं घर!

'बाहुबली' दिग्दर्शक राजामौली यांच्या 'RRR' मधून आलियाचा पत्ता कट? प्रियांका चोप्राने मारली बाजी!

बिपाशाने सांगितला इंडस्ट्रीचा खरा चेहरा, जेव्हा एका मोठ्या प्रोड्युसरने केला होता विचित्र मेसेज!

Web Title: Sameera Reddy talks about being rejected in Bollywood because of her looks