समांथा रुथ प्रभूची 'ही' वेबसीरिज आहे लोकप्रिय, IMDb वर सर्वाधिक रेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:34 IST2023-04-27T19:34:12+5:302023-04-27T19:34:41+5:30
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आज 35 वा वाढदिवस साजरा करते आहे.

समांथा रुथ प्रभूची 'ही' वेबसीरिज आहे लोकप्रिय, IMDb वर सर्वाधिक रेटिंग
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आज 35 वा वाढदिवस साजरा करते आहे. समांथा रूथ प्रभूला तमिळ, तेलुगू आणि हिंदी शीर्षकांची वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या वेगवेगळ्या पात्रांना सादर केल्यानंतर भारतीय श्रोते आणि समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणात नावाजले गेले आहे. समांथा रुथ प्रभू ही साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. समांथा सध्या तिचा चित्रपट शकुंतलम आणि आगामी वेब सीरिज सिटाडेलमुळे चर्चेत आहे.
अलिकडेच आलेल्या तिच्या शाकुंतलममध्ये लक्षवेधक प्रदर्शनासाठी तिचे कौतुक केले गेले जात आहे. एस. एस. राजामौलीसोबत एगामध्ये काम केलेल्या समंथाने प्राईम व्हिडिओवरील एक्शन थ्रिलर असलेल्या द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीजनसह ओटीटीवर पदार्पण केले. सध्या ती सिटाडेल: इंडियाचे, शूटींग करत आहे व त्यामध्ये ती वरूण धवनसोबत पडद्यावर दिसणार आहे.
IMDb वरील समंथा रूथ प्रभूची सर्वाधिक रेटींग असलेली टॉप 10 शीर्षके अशी आहेत-
1. द फॅमिली मॅन - 8.7
2. महानाती - 8.4
3. सुपर डीलक्स - 8.3
4. रंगस्थलम - 8.2
5. कठ्ठी - 8.1
6. मनम - 7.9
7. 24 - 7.8
8. गूदाचारी - 7.8
9. एगा - 7.7
10. ये मय्या चेसावे - 7.7
वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर, सिटाडेलमध्ये सामंथा वरुण धवनच्या विरुद्ध भूमिका साकारली आहे. त्याचे शूटिंगही सुरू झाले आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीला कुशी या तेलगू चित्रपटातही मुख्य अभिनेत्री म्हणून साइन करण्यात आले आहे.