सामंथाने लाल रंगाच्या ड्रेसमधील खास फोटो केले शेअर, बघून घायाळ झाले फॅन्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 14:14 IST2022-02-21T14:13:59+5:302022-02-21T14:14:36+5:30
Samantha Ruth Prabhu : पुष्पातील सामंथाच्या 'उ अंटावा' गाण्याची तर अजूनही क्रेझ आहे. अशात तिने एक फोटो शेअर केलाय ज्याची चर्चा होत आहे.

सामंथाने लाल रंगाच्या ड्रेसमधील खास फोटो केले शेअर, बघून घायाळ झाले फॅन्स!
साउथ इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आणि 'पुष्पा'तील आयटम नंबरमुळे देशभरातील लोकांना थिरकायला लावणारी सामंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी आपल्या लूकमुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होत असतात. पुष्पातील तिच्या 'उ अंटावा' गाण्याची तर अजूनही क्रेझ आहे. अशात तिने एक फोटो शेअर केलाय ज्याची चर्चा होत आहे.
सामंथा रूथ प्रभू सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव आहे. ती नेहमीच तिच्या फॅन्ससाठी तिचे फोटो शेअर करत असते. सामंथा पती नागा चैतन्यपासून वेगळी झाल्यापासून निसर्गाचा आनंद घेत आहे. तिने आता केरळमधील फोटो शेअर केले आहेत. सामंथा सध्या केरळमध्ये निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहे आणि निसर्ग एन्जॉय करत आहे.
सामंथाने तिच्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत सामंथा डोंगरावर उभी आहे आणि हात मोकळे सोडले आहेत. तेच दुसऱ्या फोटोत ती अथिरापल्ली फॉल्सजवळ दगडावर बसली आहे. अथिरापल्ली हा केरळमधील सर्वात मोठा वॉटरफॉल आहे.
सामंथाचे दोन्ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोवर फॅन्स भरभरून कमेंट करत आहेत. एका फॅन्सने लिहिलं की, तू फार सुंदर दिसत आहे. तर काही यूजर्सने कमेंटमध्ये शायरी पोस्ट केली आहे.