समांथाने 'बेबी जॉन'साठी कीर्ती सुरेशची केली होती शिफारस, अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:25 IST2024-12-31T15:25:10+5:302024-12-31T15:25:49+5:30

Baby John Movie : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे.

Samantha Ruth Prabhu recommended Keerthy Suresh for 'Baby John', reveals the actress | समांथाने 'बेबी जॉन'साठी कीर्ती सुरेशची केली होती शिफारस, अभिनेत्रीचा खुलासा

समांथाने 'बेबी जॉन'साठी कीर्ती सुरेशची केली होती शिफारस, अभिनेत्रीचा खुलासा

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन(Varun Dhawan)चा 'बेबी जॉन' (Baby John Movie) हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) मुख्य भूमिकेत आहे. कीर्तीने या चित्रपटातील भूमिकेबाबत खुलासा केला आहे. बेबी जॉन बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाहीये. कीर्ती सुरेशने बेबी जॉनमधील तिच्या अभिनयाने प्रभावित केले आहे. कीर्ती सुरेशने नुकतेच या चित्रपटाबाबत खुलासा केला आहे.

कीर्तीने सांगितले की, समांथा रुथ प्रभूने बेबी जॉनसाठी तिची शिफारस केली होती. ॲटली यांच्या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे. थेरी या तमिळ चित्रपटात सामंथा रुथ प्रभू आणि थलापथी विजय मुख्य भूमिकेत दिसले होते. थेरीच्या रिमेकमध्ये कीर्ती सामंथाच्या भूमिकेत दिसत आहे. गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कीर्तीने समांथाचे आभार मानले कारण तिने चित्रपटासाठी तिच्या नावाची शिफारस केली होती.


कीर्ती म्हणाली की, जेव्हा हे सर्व घडत होते तेव्हा कदाचित ती माझ्याबद्दल विचार करत होती. हीच गोष्ट मला वरुणनेही सांगितले होते. यासाठी मी जितकेही आभार मानेन तितके कमीच आहे. 'कीर्ती ही व्यक्तिरेखा खूप चांगल्या प्रकारे साकारू शकेल', असे म्हणणे खूप गोड आहे. तमिळमधील 'थेरी' मधील तिचा अभिनय माझ्या आवडीपैकी एक आहे. ती पुढे म्हणाली की, मला आठवते की बेबी जॉनचा ट्रेलर पाहिल्यानंतर तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यामध्ये तिने लिहिले होते की, 'मी हे इतर कोणाशीही शेअर करत नाही, पण मी तुझ्यासोबत शेअर करेन. कीर्तीने बेबी जॉन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही पण कीर्तीचा अभिनय खूप आवडला आहे.

Web Title: Samantha Ruth Prabhu recommended Keerthy Suresh for 'Baby John', reveals the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.