Samantha : 'शाकुंतलम'ची फायनल कॉपी पाहून भावूक झाली समंथा, म्हणाली - हा चित्रपट नेहमीच....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 06:18 PM2023-03-14T18:18:53+5:302023-03-14T18:25:37+5:30

समंथा सध्या तिच्या 'शाकुंतलम' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतीच या सिनेमाची फायनल कॉपी पाहिली आहे.

Samantha ruth prabhu pens a heartfelt note after watching the final copy of shakuntalam | Samantha : 'शाकुंतलम'ची फायनल कॉपी पाहून भावूक झाली समंथा, म्हणाली - हा चित्रपट नेहमीच....

Samantha : 'शाकुंतलम'ची फायनल कॉपी पाहून भावूक झाली समंथा, म्हणाली - हा चित्रपट नेहमीच....

googlenewsNext

साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या चित्रपटांमुळे सतत चर्चेत असते. समंथा सध्या तिच्या 'शाकुंतलम' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'शकुंतलम' चित्रपटात तिने मेनका आणि विश्वामित्र यांच्या मुलीची शकुंतलाची भूमिका साकारली होती. अलीकडेच समांथाने या चित्रपटाची फायनल कॉपी पाहिली आणि ती पाहिल्यानंतर समंथा खूपच भावूक झाली, यानंतर तिने सोशल मीडियावर तिने पोस्ट शेअर केली. 


समंथाने पाहिली 'शाकुंतलम'ची फायनल कॉपी
अलिकडेच, समंथाने तिच्या आगामी 'शाकुंतलम' चित्रपटाची फायनल कॉपी पाहिल्यानंतर तिच्या  इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. समंथाने लिहिले, 'शेवटी मी हा चित्रपट पाहिला. गुणशेखर गरु हा चित्रपट पाहिल्यानंतर आता तुझ्याकडे माझे हृदय आहे. किती सुंदर चित्रपट आहे हा. आमच्या महान महाकाव्यांपैकी एक. याला तुम्ही खूप प्रेमाने जिवंत केले आहे. शकुंतलम नेहमी माझ्या जवळ राहील.


'शाकुंतलम'मध्ये सामंथा रुथ प्रभू, देव मोहन, अल्लू अर्हा, सचिन खेडेकर, कबीर बेदी, डॉ. मोहन बाबू, प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, आदिती बालन, अनन्या नागल्ला, जिशू सेनगुप्ता यांच्याशिवाय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अल्लू अर्जुनची मुलगी अरहा या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. 


'शाकुंतलम' चित्रपटाची कथा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांच्या दंतकथेपासून प्रेरित असून महान कवी कालिदासाच्या 'अभिज्ञान शकुंतलम' या संस्कृत नाटकातून घेण्यात आली आहे. या चित्रपटात सामंथाने मेनका आणि विश्वामित्र यांची मुलगी शकुंतलाची भूमिका साकारली होती. गुणशेखर निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Samantha ruth prabhu pens a heartfelt note after watching the final copy of shakuntalam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.