"थांबवा हे सगळं" असं म्हणत पापाराझीवर भडकली समांथा, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:08 IST2025-06-17T17:48:19+5:302025-06-17T18:08:23+5:30

कायम हसतमुख असलेल्या समांथाचा एक वेगळाच अवतार नुकताच पाहायला मिळालाय.

Samantha Ruth Prabhu Got Angry At The Paparazzi Video Viral | "थांबवा हे सगळं" असं म्हणत पापाराझीवर भडकली समांथा, नेमकं काय घडलं?

"थांबवा हे सगळं" असं म्हणत पापाराझीवर भडकली समांथा, नेमकं काय घडलं?

Samantha Ruth Prabhu Angry On Paps: पापाराझी हे कलाकारांना अनेक ठिकाणी फॉलो करत असतात. घराबाहेर जीमबाहेर किंवा विमानतळावर बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दलचे प्रत्येक अपडेट विविध इन्स्टाग्राम पेजवर नेटकऱ्यांना पाहायला मिळतात. अनेकदा या कलाकारांचे पापाराझींबरोबर वाद होतात. अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

समांथा ही तिच्या शांत स्वभावासाठी ती ओळखली जाते. कायम हसतमुख असलेल्या समांथाचा एक वेगळाच अवतार नुकताच पाहायला मिळालाय. नुकतंच जिमच्या बाहेर समांथाचे फोटो काढण्यासाठी पापाराझींनी गर्दी केली. तेव्हा समांथा चिडलेली दिसली. पापाराझी हे कॅमेरा तिच्या फार जवळ घेऊन जात होते. यावेळी "स्टॉप इट गाइज...प्लीज!" असं तिनं पापाराझींना म्हटलं. यावेळी तिच्या एका हातात पाण्याची बाटली होती, तर दुसऱ्या हातात मोबाईल होता आणि ती कोणाशी तरी बोलत होती. तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायल झाला आहे.


समांथाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती अलिकडेच 'सिटाडेल: हनी बनी'मध्ये पाहायला मिळाली होती. खास गोष्ट म्हणजे समांथा आता निर्मिती क्षेत्रातदेखील उतरली आहे. तिचा निर्माती म्हणून पहिला सिनेमा 'शुभम' ९ मे रोजी प्रदर्शित झाला होता. थिएटरनंतर हा सिनेमा ओटीटीवरही आला आहे.  तुम्ही 'शुभम' सिनेमा जिओहॉटस्टारवर पाहू शकता. तिच्या लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर तिचं नाव सध्या  दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी जोडलं जात आहे. समांथानं राजसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, पण तिनं अद्याप या नात्याबद्दल सांगितलं नाहीये.


Web Title: Samantha Ruth Prabhu Got Angry At The Paparazzi Video Viral