चित्रपट लीक करणाऱ्यांना जेलमध्ये टाका- सलमान खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 20:45 IST2016-07-16T15:11:17+5:302016-07-16T20:45:45+5:30
सुपरस्टार सलमान खानचे म्हणणे आहे की, चित्रपट आॅनलाइन लीक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. नुकताच ‘उडता पंजाब’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ ...

चित्रपट लीक करणाऱ्यांना जेलमध्ये टाका- सलमान खान
स परस्टार सलमान खानचे म्हणणे आहे की, चित्रपट आॅनलाइन लीक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. नुकताच ‘उडता पंजाब’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ आणि सलमान स्टारर ‘सुलतान’ हे चित्रपट अधिकृत रिलीजच्या अगोदर लीक झाले. सलमानने मुलाखतीत सांगीतले की, रिलीज होण्याअगोदरच चित्रपट लीक होणे, ही खूप खेदनीय बाब आहे. हे लोक चोरापेक्षा कमी नाहीत, कारण हे दुसऱ्यांच्या कठोर परिश्रमावर पैसे बनवितात. हा सर्वात खराब व्यवसाय आहे. पूढे सलमान म्हणाला, काही लोकांनी सुचविले आहे की, अशा लोेकांना टाडा लावला पाहिजे, जे यांना पायरेटेड सीडी विकतात आणि खरीदतात. आम्ही कर चुकवितो आणि महाराष्ट्रात तो सर्वाधिक कर आहे, म्हणून काहीना काही तर करायलाच हवे. जेव्हा दोन लोकं जेल जातील तर बाकी लोक स्वत: हे करणे बंद करतील. असे साऊथमध्ये कधी घडत नाही.