चाहत्यांसाठी सलमानची अनोखी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 17:29 IST2016-12-28T17:29:09+5:302016-12-28T17:29:09+5:30

बॉलिवूडचा ‘दंबग’ सलमान खानने नुकताच आपला ५१ वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजार केला. विशेष म्हणजे या वाढदिवसाला त्याने आपल्या ...

Salman's unique gift to fans | चाहत्यांसाठी सलमानची अनोखी भेट

चाहत्यांसाठी सलमानची अनोखी भेट

लिवूडचा ‘दंबग’ सलमान खानने नुकताच आपला ५१ वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजार केला. विशेष म्हणजे या वाढदिवसाला त्याने आपल्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. वाढदिवस साजरा करीत असताना सलमानने ‘बीर्इंग इन टच’ नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सलमानच्या व्यावसायिक व खासगी जीवनाबद्दल माहिती मिळणार आहे. 

मंगळवारी अ‍ॅप लाँच करताना सलमानने १८ सेकंदाचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. सलमान यात म्हणतो, स्वागत मत करो आप हमारा... हम आपका स्वागत करते है. ‘बीर्इंग इन टच’मे स्वागत है आपका. अभी डाऊनलोड किजिए. लाईव्ह...

या अ‍ॅपमध्ये सलमानच्या चित्रपटातील नायकांना गेम्समध्ये रुपातंरित करण्यात आले आहे. यात चुलबुल पांडे, प्रेम व टायगर अशा तीन पात्रांचे गेम्स असून अनेक गोष्टी यात आहेत. आतापर्यंत सुमारे २५ हजार लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. यातून सलमानविषयी लेटेस्ट माहिती चाहत्यांना मिळणार आहे. 

gift form salman to fans

सलमानने त्याच्या पहिल्या लाईव्ह कॉन्सर्ट ‘दबंग द टूअर’ची घोषणा देखील केली आहे. त्याचा पहिला लाईव्ह शो आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे होणार असून चॉकलेट रूम या संस्थेने त्याचे आयोजन केले आहे. सलमानची डान्स करण्याची वेगळी स्टाईल मनोरंजक आहे व ही स्टाईल आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथील प्रेक्षकांनाही भुरळ घालेल असा विश्वास आहे. एप्रिल २०१७ मध्ये हा कॉन्सर्ट होईल व त्यावेळी सलमानबरोबर सोनाक्षी सिन्हा. बिपाशा बसू, प्रभूदेवा, डेझी शाह, मनीश पॉल हेही त्यात सामील होणार आहेत.

हा पहिला कॉन्सर्ट आॅस्ट्रेलिया व न्यूझिलंडमध्ये जरी होणार असला तरी देखील भारतातील त्याच्या चाहत्यांसाठी तो लवकरच कॉन्सर्ट आयोजित करेल असे सांगण्यात येत आहे. 

Web Title: Salman's unique gift to fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.