‘त्या’ विधानासाठी माफी मागण्यास सलमानचा नकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 16:30 IST2016-07-14T11:00:21+5:302016-07-14T16:30:21+5:30
‘सुलतान’साठी आखाड्यातील दृश्ये साकारताना माझी अवस्था बलात्कारपीडित महिलेसारखी झाली होती, या सलमान खानच्या वादग्रस्त विधानाने त्याला अनेकांच्या तीव्र विरोधाचा ...

‘त्या’ विधानासाठी माफी मागण्यास सलमानचा नकार!
‘ ुलतान’साठी आखाड्यातील दृश्ये साकारताना माझी अवस्था बलात्कारपीडित महिलेसारखी झाली होती, या सलमान खानच्या वादग्रस्त विधानाने त्याला अनेकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला होता. त्याच्या या विधानावर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज्य महिला आयोगानेही सलमानच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत, त्याला नोटीस बजावली होती. या विधानासाठी सलमानने रितसर माफी मागावी अशी मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने माफी मागण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी स्वत:चे लेखी स्पष्टीकरण सलमानने आयोगासमक्ष सादर केले आहे. माहीती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वत: सलमानचे लेखी स्पष्टीकरण मिळाले असल्याचे सांगितले आहे. सलमानने आयोगाला दिलेल्या या उत्तराचा सारासार विचार करुन त्यानंतरच योग्य तो निर्णय आयोगाकडून घेण्यात येइल असे त्या म्हणाल्या. या वादग्रस्त विधानाप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने सलमानला न्यायालयाचे समन्स पाठवले होते. काही दिवसांपूर्वी सलमानला या प्रकरणी आयोगासमोर सादर व्हायचे होते, पण सलमान सादर झाला नाही. त्यामुळे आता आयोगातर्फे तिसरे आणि शेवटचे समन्स पाठवण्यात आले आहे. आता या संबंधी अभिनेता सलमान खान काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.