​‘ट्युबलाइट’ मधील सलमानचा पहिला लूक आउट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 11:35 IST2016-08-16T06:05:22+5:302016-08-16T11:35:22+5:30

१९६२ मध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘ट्युबलाइट’ चित्रपटातील सलमान खानचा पहिला लूक नुकताच आउट झाला ...

Salman's first look out for 'TubLight' | ​‘ट्युबलाइट’ मधील सलमानचा पहिला लूक आउट

​‘ट्युबलाइट’ मधील सलमानचा पहिला लूक आउट


/>१९६२ मध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘ट्युबलाइट’ चित्रपटातील सलमान खानचा पहिला लूक नुकताच आउट झाला आहे. या फोटोत सलमानचा चेहरा जरी दिसत नसला तरी सलमान सैन्याच्या गणवेशात लढाकच्या भूमीवर दिसत आहे. कबीर खानचा ‘ट्युबलाइट’ या सिनेमाचे सध्या लडाखमध्ये चित्रिकरण सुरू आहे. सलमान खान या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. ७० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्त्य साधून कबीर खान याने सैनिकी गणवेशातला सलमानचा फोटो ट्विटरवर शेअर केला. तसेच त्यांनी आपल्या चाहत्यांना स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखिल दिल्या.
 या चित्रपटात प्रेमकथा दाखवली आहे. सलमानच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी उत्सुकता आहे. या चित्रपटातील सलमानच्या पहिल्या लूकवरून तरी तो सैनिकाच्या रुपात दिसणार हे नक्की. या चित्रपटात सलमान सोबत चीनमधली प्रसिद्ध अभिनेत्री झू झू ही देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने आपला सलमान सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता

Web Title: Salman's first look out for 'TubLight'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.