/>सलमान खान याने आपल्या पुढील दहा चित्रपटांच्या टेलिकास्टचे राईट्स विकून १००० कोटींची डिल केली आहे. होय, सलमानने एका चॅनलसोबत १००० कोटी रूपयांची सॅटेलाईट डिल केली आहे. यात काही वर्षांपर्यंतचा सलमानचा टीव्ही अपीयरेंसही सामील आहे. ही डिल करून सलमानने हृतिक रोशनचा रेकॉर्ड मोडीस काढला आहे. हृतिकने आपल्या सहा चित्रपटांचे सॅटेलाईट्स ५५० कोटींना विकून विक्रम रचला होता. आता हा रेकॉर्ड सलमानच्या नावावर असेल. सलमानला बॉलिवूडमध्ये सध्या तोड नाही. ‘एक था टायगर’,‘बजरंगी भाईजान’ व नुकताच रिलीज झालेला ‘सुलतान’ हे सलमानचे तिन्ही चित्रपट सुपरडुपर हिट राहिले. ‘सुलतान’ने तर कमाईचे सगळे रेकॉर्डच तोडले. सलमानची ही लोकप्रीयता पाहून संबंधित चॅनलने त्याच्याशी एवढी मोठी डिल केली. यापूर्वीही सलमानने एका चॅनलशी १० चित्रपटांसाठी ५०० कोटी रूपयांची डिल केली होती. म्हणजे एका चित्रपटासाठी ५० कोटी. पण आता नव्या डिलमध्ये एका चित्रपटासाठी सलमानला १०० कोटी मिळतील. यात ‘सुलतान’चा टीव्ही प्रीमिअर असेल वा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र दिग्दर्शक कबीर खान याचा आगामी ‘ट्यूबलाईट’ यासोबतच ‘दबंग३’, ‘जुडवा२’, ‘नो एंट्री में एंट्री’, ‘किक २’ सह राजकुमार संतोषी यांचा एक अनामिक चित्रपट या टेलिकास्ट डिलमध्ये असू शकतात.
Web Title: Salman's Another Record: 1000 Crores The Biggest Satellite Deal!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.