​हर्षवर्धनसाठी सलमानचा सल्ला!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2016 16:53 IST2016-11-13T16:53:54+5:302016-11-13T16:53:54+5:30

मुलाला स्वत:च्या हिमतीवर त्याचे करिअर घडवायचे असले तरी वडिलाला मुलाची काळजी वाटणे साहजिक आहे. अनिल कपूर यांनाही मुलाची नेमकी ...

Salman's advice for Harsh Vardhan !! | ​हर्षवर्धनसाठी सलमानचा सल्ला!!

​हर्षवर्धनसाठी सलमानचा सल्ला!!

लाला स्वत:च्या हिमतीवर त्याचे करिअर घडवायचे असले तरी वडिलाला मुलाची काळजी वाटणे साहजिक आहे. अनिल कपूर यांनाही मुलाची नेमकी हीच काळजी वाटतेय. हर्षवर्धनच्या करिअरची चिंता त्यांना सतावू लागलीय. हर्षवर्धनने ‘मिर्झिया’मधून बॉलिवूड डेब्यू केले. निश्चितपणे या चित्रपटाकडून हर्षवर्धन इतकीच अनिल यांनाही मोठी अपेक्षा होती. पण बॉक्सआॅफिसवर ‘मिर्झिया’ दणकून आपटला. एकंदर काय, अनिल यांनी जसा विचार केला होता, तसे हर्षवर्धनबद्दल काहीही घडले नाही. त्यामुळेच अनिल यांना हर्षच्या करिअरची चिंता सतावू लागलीय. आता चिंता म्हटल्यावर ती दूर करण्याचे उपायही शोधायला हवा ना. अनिल यांनी असाच एक उपाय शोधलाय. तो म्हणजे सलमान. होय, हर्षवर्धनच्या करिअरसाठी अनिल  सलमानकडून सल्ला घेत आहेत.  अलीकडे अनिल यांनी सलमानची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सलमानला हर्षच्या करिअरबद्दल योग्य मार्गदर्शन करण्याची विनंती केल्याचे समजते. खरे तर हर्षने एखाद्या बिग बजेट रोमॅन्टिक-कॉमेडीमधून डेब्यू करावा, अशी अनिल यांची इच्छा होती. पण हर्षने ‘मिर्झिया’ची निवड केली. निश्चितपणे हर्षची ही निवड चुकली. ‘मिर्झिया’नंतर हर्ष विक्रमादित्य मोटवानी यांच्या ‘भावेश जोशी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यापश्चात श्रीराम राघवनच्या एका चित्रपटातूनही तो दिसू शकतो.  हे दोन्ही चित्रपट हर्षच्या करिअरसाठी किती यशस्वी सिद्ध होतात, हे तर ठाऊक नाही. तसेच सलमानच्या सल्लयानुसार अनिल हर्षला काय सुचवतात, तेही ठाऊक नाही. सो, वेट अ‍ॅण्ड वॉच!

Web Title: Salman's advice for Harsh Vardhan !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.