​सलमानवर का भडकले अक्षयचे चाहते??

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 17:30 IST2016-08-03T12:00:46+5:302016-08-03T17:30:46+5:30

होय, सलमान खानवर अक्षय कुमारचे चाहते जाम भडकले आहेत. कारण ??? कारण म्हणजे सलमानने चालवलेले ‘रूस्तम’चे प्रमोशन. होय, अक्षयचा आगामी चित्रपट ‘रूस्तम’ लवकरच रिलीज होत आहे. सलमानने ‘रूस्तम’चे सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन चालवले आहे.

Salman wants to be baffled ?? | ​सलमानवर का भडकले अक्षयचे चाहते??

​सलमानवर का भडकले अक्षयचे चाहते??

य, सलमान खानवर अक्षय कुमारचे चाहते जाम भडकले आहेत. कारण ??? कारण म्हणजे सलमानने चालवलेले ‘रूस्तम’चे प्रमोशन. होय, अक्षयचा आगामी चित्रपट ‘रूस्तम’ लवकरच रिलीज होत आहे. सलमानने ‘रूस्तम’चे सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन चालवले आहे. बॉलिवूडचा खरा ‘सुलतान’ मी नाही तर अक्षय कुमार आहे, असे अलीकडे सलमान म्हणताना दिसला. केवळ एवढेच नाही तर सध्या सलमान सोशल मीडियावर ‘रूस्तम’ला प्रमोट करतो आहे. ‘१२ अगस्त को हमारी फिल्म इंडस्ट्री के रूस्तमेहिंद की फिल्म आ रही है...नाम है रूस्तम. जाकर देखिए अक्षय कुमार की फिल्म रूस्तम ’ असा एक व्हिडिओ सलमानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र अक्षयच्या चाहत्यांना सलमानचा हा व्हिडिओ अजिबात रूचलेला नाही, असेच दिसतेयं. अनेक चाहत्यांनी याबद्दलची नाराजी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवली आहे. ‘अकी भाई, आपकी मूवी आपके दम पर देखने जाएंगे. आपको जरूरत नही किसी का सपोर्ट लेने की’,असे अक्षयच्या एका चाहत्याने लिहिले आहे. दुसºया एका चाहत्यानेही काहीशा अशाच भावना व्यक्त केल्या आहे. ‘आपको किसी के सपोर्ट की जरूरत नही. आप यह व्हिडिओ शेअर करके अपने फॅन्स को उदास क्यों कर रहे है. आपको ढेरों फॉलोअर्स है, उन्हे नीचा मत दिखाइए’, असे त्याने लिहिले आहे..


 

{{{{twitter_video_id####}}}}


Web Title: Salman wants to be baffled ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.