सलमान खान १८ नोव्हेंबरला लग्न करण्याची मागील काही दिवसापासू चर्चा आहे. खुुद सलमाननेही एका पार्टीमध्ये हे जाहीर केलेले आहे. ...
सलमानने घेतले नवीन घर
/>सलमान खान १८ नोव्हेंबरला लग्न करण्याची मागील काही दिवसापासू चर्चा आहे. खुुद सलमाननेही एका पार्टीमध्ये हे जाहीर केलेले आहे. सलमान हा बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंट मधील एका साधारण फ्लॅटमध्ये राहतो. एवढ्या मोठ्या स्टारसाठी हा फ्लॅट खूप छोटा होता. त्यामुळे तो आता एका मोठ्या घरामध्ये शिफ्ट होत आहे. या घरत सलमानचे आई-वडिल सुरुवातीपासून राहतात. अरबाज व सोहेल खान हे सलमानाचे दोन्ही भाऊसुद्धा या गॅलक्सी अपार्टमेंट राहत होते. परंतु, लग्न होताच ते आपआपल्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले. आता सलमानचीही दुसºया अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होण्याची प्लॅनिंग आहे. सूत्रानुसार सलमानने बांद्रा येथील लिंकिंग रोडला एक नवीन घर खरेदी केले आहे. ‘लिटिल स्टार’ असे त्या घराचे नाव आहे. तेथे सध्याला डेव्हलपिंगचे काम सुरु आहे. आईवडिलांसह तो नवीन घरात शिफ्ट होणार आहे. लग्नाची पूर्ण तयारीही त्याने केली आहे. त्यामुळेच तो घरही शिफ्ट करीत आहे.