‘जिंदा है टायगर’ मध्ये सलमान - कॅटरिना सोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 19:51 IST2016-09-13T14:21:52+5:302016-09-13T19:51:52+5:30
सलमान खानच्या चाहत्यासाठी खुशखबर असून, ‘जिंदा है टायगर’ या चित्रपटात सलमान व कॅटरिना कैफ हे सोबत दिसणार आहेत. हा ...

‘जिंदा है टायगर’ मध्ये सलमान - कॅटरिना सोबत
या दोघांना एक था टायगरमध्ये रोमान्स करताना दाखविण्यात आले होते. आता पुन्हा ते रोमान्स करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट पार्ट ‘एक था टायगर’चे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. परंतु, दुसरे पार्टचे दिग्दर्शन अली अब्बास करीत आहेत. कबीर व सलमान हे दोघे ‘ट्यूबलाईट’ मध्ये सोबत काम करीत आहेत. एक था टायगर व ‘बजरंगी भाईजान’ नंतर ट्यूबलाईट या दोघांचा सोबत तिसरा चित्रपट आहे. कॅटरिनाने सुद्धा कबीरसोबत याअगोदर ‘न्यू यॉर्क’ व ‘एक था टायगर मध्ये काम केलेले आहे. हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित होत आहे.