ट्विटरवर सलमान-सोनमची 'इमोजी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:18 IST2016-01-16T01:14:24+5:302016-02-07T06:18:27+5:30

सोशल साईट ट्विटरनं सोमवारी सलमान खान आणि सोनम कपूर यांची दिवाळी इमोजी (स्मायलीप्रमाणे डिजिटल आयकॉन) प्रसिद्ध केलं. सलमान-सोनमचा 'प्रेम ...

Salman-Sonamchi's 'Emoji' on Twitter | ट्विटरवर सलमान-सोनमची 'इमोजी'

ट्विटरवर सलमान-सोनमची 'इमोजी'

शल साईट ट्विटरनं सोमवारी सलमान खान आणि सोनम कपूर यांची दिवाळी इमोजी (स्मायलीप्रमाणे डिजिटल आयकॉन) प्रसिद्ध केलं. सलमान-सोनमचा 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट या दिवाळीत प्रदर्शित होत आहे. ट्विटरचे आशिया-पॅसिफिक, मध्य-पूूर्व आणि उत्तर आफ्रिकेचे उपाध्यक्ष ऋषी जेटली यांनी सांगितले, की या दिवाळीच्या आनंदात या इमोजीमुळे भर पडणार आहे. जगभरातील नागरिकांच संवादाचं प्रभावी माध्यम ट्विटर आहे.
जगभरातील भारतीय दिवाळी साजरी करताना संवादासाठी ट्विटरवर एकत्र येतील. आपले अनुभव, आनंदी क्षण ते ट्विटरवर संवादातून परस्परांपर्यंत पोहोचवतील व आनंद द्विगुणित करतील. हे इमोजी त्यांना आपला आनंद शेअर करण्यासाठी मदत करेल. सलमान आणि सोनमनं पहिल्या इमोजीचं प्रकाशन केलं.
केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरचे सॅन जोस येथील मुख्यालयात 'मेक इन इंडिया'चं इमोजी प्रकाशित केल्यानंतर हे दिवाळी इमोजी प्रकाशित झालं. ट्विटरनं नमूद केलंय, की ट्विट करताना 'हॅशटॅग हॅपी दिवाली' केल्यानंतर दिव्याचा समावेश असलेलं खास इमोजी ट्विटवर दिसू लागेल.

Web Title: Salman-Sonamchi's 'Emoji' on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.