सलमान म्हणतोय मला दोन मुले आहेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 14:54 IST2016-05-24T09:24:10+5:302016-05-24T14:54:10+5:30
अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. सलमान त्याच्या वाढदिवसाला लुलिया व्हँटर या रोमियन अभिनेत्रीशी ...
.jpg)
सलमान म्हणतोय मला दोन मुले आहेत
अ िनेता सलमान खान लग्न कधी करणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. सलमान त्याच्या वाढदिवसाला लुलिया व्हँटर या रोमियन अभिनेत्रीशी लग्न करणार असल्याची चर्चाही होती. पण मी इतक्या लवकर तरी लग्न करणार नसल्याचे सलमानने मीडियाला सांगितल्यामुळे या चर्चांना आता विराम मिळाला आहे. तुझे लग्न ठरल्यावर तरी तू लग्नाची तारीख लोकांना सांगशील का असा प्रश्न एका वर्तमानपत्राने सलमानला विचारल्यावर त्यावर त्याने एक मजेशीर उत्तर दिले आहे. त्याने म्हटले आहे की, मी आता म्हणेन की मी लग्न करत आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणेन मी लग्न करतच नाही. तर पुढे जाऊन मी हेही बोलेन की माझे लग्न होऊन अनेक वर्षं झाली आहेत आणि मला दोन मुलेही आहेत. त्यामुळे मी या प्रश्नाचे उत्तर कधीच नीट देणार नाही हे मीडियाने नेहमीच लक्षात ठेवावे.