सलमान रश्दींची हतबलता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:11 IST2016-01-16T01:18:20+5:302016-02-06T13:11:22+5:30
साहित्यामध्ये विख्यात असलेल्या बुकर पुरस्काराच्या यादीत नाव येण्याचे आपले दिवस संपले असल्याची कबुली बुकर पुरस्कार विजेता सलमान रश्दी यांनी ...
.jpg)
सलमान रश्दींची हतबलता
स हित्यामध्ये विख्यात असलेल्या बुकर पुरस्काराच्या यादीत नाव येण्याचे आपले दिवस संपले असल्याची कबुली बुकर पुरस्कार विजेता सलमान रश्दी यांनी दिली आहे. सध्या नवागत लेखक ज्या पद्धतीने लिहीत आहेत, ते पाहता नावाजलेल्यांना संधी मिळणार नाही, हे नक्की आहे. मुंबई येथे जन्मलेल्या आणि न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य असणार्या रश्दी यांना १९८१ साली 'मिडनाईटस् चिल्ड्रन' या पुस्तकासाठी बुकर पुरस्कार मिळाला होता. रश्दी यांचे नाव तीन वेळा यादीत आले होते. १९८३ साली 'शेम', १९८८ साली 'द सॅटॅनिक व्हर्सेस' आणि १९९५ साली 'द मूर्स लास्ट साय' या पुस्तकांचे नाव यादीत समाविष्ट होते. २00५ साली 'शालीमार द क्लाऊन' आणि २00८ साली 'द एंचांट्रेस ऑफ फ्लॉरेन्स' यांचा समावेश होण्याची अपेक्षा होती. गेल्या २0 वर्षांपासून मी बुकर पुरस्काराच्या यादीत नाही. त्यामुळे ते दिवस गेले असल्याचे रश्दी यांनी सांगितले.