सलमान-रणवीरची ‘धूम’ ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 17:09 IST2016-05-10T11:38:57+5:302016-05-10T17:09:23+5:30
रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा धूम मॅजिक होणार हे डिसेंबरमध्येच जाहीर झालंय. मात्र धूम रिलोडेडमध्ये धुमाकूळ घालणारे कोण याबाबतचा सस्पेन्स ...
.jpg)
सलमान-रणवीरची ‘धूम’ ?
मात्र या स्टार्सच्या नावावरुन पडदा उठला आहे. दबंग सलमान खान आणि रणवीर सिंह धूम रिलोडेडमध्ये भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. धूम रिलोडेड हा सिनेमा तरुणाईला आकर्षित करणारा असेल असं आदित्य चोप्रानं स्पष्ट केलं आहे.
त्यामुळं तरुणाईचा फेव्हरेट रणवीर सिंह धूम रिलोडेड सिनेमासाठी आघाडीवर असल्याचं समजतंय. तर दुसरीकडे खलनायक साकारण्यासाठी उत्सुक असल्याचं सलमाननं नुकतंच म्हटलंय.
त्यातच यशराज फिल्म्सची सलमानशी चर्चाही सुरु असल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु आहेत. त्यामुळं धूम-रिलोडेडमध्ये सलमान आणि रणवीरची जोडी दिसली तरी आश्चर्यचकीत होऊ नका