सलमानची ऐश्वर्यासाठी मध्यस्थी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 12:40 IST2016-09-28T07:10:34+5:302016-09-28T12:40:34+5:30
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतलीयं आणि यामुळे करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा ...
.jpg)
सलमानची ऐश्वर्यासाठी मध्यस्थी!
उ ी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतलीयं आणि यामुळे करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा आगामी सिनेमा चांगलाच अडचणीत सापडलायं. करणच्या या चित्रपटात पाकी अभिनेता फवाद खानची भूमिका आहे. हे पचनी न पडल्याने ‘ऐ दिल है मुश्किल’ प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. यामुळे करणचे धाबे दणाणणे साहजिक आहे. अशास्थितीत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करणच्या मदतीला धावून आल्याची खबर आहे. होय, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करणसोबतचे सगळे जुने मतभेद विसरून सलमानने म्हणे, या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. विशेष म्हणजे याकामी सलमानने स्वत: पुढाकार घेतला. मनसेसोबतच्या वादात आपण करण जोहरला मदत करू शकतो, असे सलमानला वाटते आणि त्याने लगेच यासंदर्भात राज यांच्याशी संपर्क साधला. या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला, हे कळायला मार्ग नाही. तसेच सलमानने ही मध्यस्थी नेमकी करणसाठीच केली की आणखी कुणासाठी(‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या राय बच्चन हिचीही भूमिका आहे) हेही कळायला मार्ग नाही. पण शेवटी मध्यस्थी कुणासाठीही असो, यामुळे करणचा जीव मात्र भांड्यात पडलाय!
![]()